शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

UN Report : भारत चीनलाही मागे टाकणार, 8 वर्षातच 'सर्वाधिक लोकसंख्येचा' देश ठरणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 12:02 IST

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पुढील आठ वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.

नवी दिल्ली - देशातील वाढती लोकसंख्या ही भारतासमोरील सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरिकांना सोयी सुविधा पुरविताना सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या, जगातील क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताचा नंबर लागतो. तर, या यादीत चीन अग्रस्थानावर आहे. मात्र, लवकरच लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकणार असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पुढील आठ वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. दरम्यानच्या काळात चीनने काही कडक नियम बनवून आणि जनजागृतीद्वारे आपल्या देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, आगामी काही वर्षात चीनच्या लोकसंख्येत 31.4 मिलियन्स घट होईल किंवा 2019 ते 2050 या कालावधीत चायनिज लोकसंख्येत 2.2 टक्क्यांची घट होणार आहे. 'द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019' या मथळ्याखाली संयुक्त राष्ट्रांचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार जगातील लोकसंख्येत 2050 पर्यंत अंदाजे 2 बिलियन्स एवढी वाढ सांगण्यात आली आहे. त्यानुसार, सध्या असलेल्या 7.7 बिलियन्स लोकसंख्येत वाढ होऊन जगातील एकूण लोकसंख्या 9.7 बिलियन्स एवढी होईल. त्यामध्ये भारतासह इतर आठ देशांची लोकसंख्या एकत्र केल्यास जगातील लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या या 8 देशांची असेल. 2050 पर्यंत ज्या 9 देशांची लोकसंख्या सर्वाधिक वाढेल, त्यामध्ये भारत, नायजेरिया आणि पाकिस्तानच्या लोकसंख्येत सर्वाधिक वाढ होणार आहे. 

जागतिक लोकसंख्या दरवाढ लक्षात घेता, जन्मदर कमी झाल्याचे दिसून येते. सन 1990 मध्ये प्रत्येक महिलेचा जन्मदर 3.2 एवढा होता, तो 2050 पर्यंत 2.2 एवढा कमी होईल. जगातील लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जन्मदर 2.1 पर्यंत कमी होणं गरजेचं आहे.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ