शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Russia Ukraine War Side Effects: युक्रेनच्या युद्धाच्या झळा आपल्याला; रुपया, शेअर बाजाराची पडझड, महागाईला आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 08:01 IST

कच्चे तेल पाेहोचले १४० डॉलर प्रति बॅरलवर. सोमवार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का देणारा ठरला. अमेरिकेने रशियावर आणखी निर्बंध लादल्याने तसेच लिबियामधील २ तेल क्षेत्र बंद पडल्याने बाजारात तेल उत्पादन कमी उतरले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती अनेक वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याने महागाईत प्रचंड वाढ होण्याची भीती आहे. याचा धसका शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी घेतल्याने शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दणकून आपटला.

मोठ्या घसरणीसह खुला झालेला शेअर बाजार दिवसभरात १,९६६.७१ अंकांनी खाली आला होता. मात्र, त्यानंतर त्यात काहीशी सुधारणा होत तो अखेर १,४९१ अंकांवर बंद झाला. निफ्टीही ३८२.२० अंकांनी कोसळून १५,८६३ ला बंद झाला.सात महिन्यांची नीचांकी पातळीमुंबई शेअर बाजार आणि निफ्टी हे घसरणीमुळे सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. गेल्या चार दिवसांत मुंबई शेअर बाजार जवळपास ६.०५ टक्क्यांनी खाली आला असून, ३,४०४.५३ अंकांनी घसरला आहे.

मोठे समभाग घसरलेॲक्सिस बँक, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या समभागांमध्ये सर्वांत मोठी म्हणजे ७.६३ टक्क्यांची घसरण दिसून आली. केवळ भारती एअरटेल, एचसीएल टेक्नोलॉजी, टाटा स्टील आणि इन्फोसिस यांचे समभाग वाढीसह बंद झाले.

बाजारातून पैसे काढणे सुरूचगेल्या काही महिन्यांपासून विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत असून, शुक्रवारी तब्बल ७,६३१.०२ कोटींच्या समभागांची विक्री करण्यात आल्याची माहिती शेअर बाजाराने दिली आहे.

काय होणार परिणाम?nसध्या बाजारात गुंतवणूक करण्याचा ओघ कमी होणार. बाजारातील अस्थिरतेमुळे नवगुंतवणूकदारांची संख्या रोडावण्याची शक्यता nम्युच्युअल फंडमधील गुंतवणूक थोडी कमी होईल.

खाद्यतेलाच्या दरात २८० रुपये वाढचैतन्य जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क : वर्धा : रशिया-युक्रेन युद्धामुळे एका दिवसात १५ किलो खाद्यतेलाच्या डब्यामागे २४० ते २८० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या तेलदराचा चटका सोसावा लागणार आहे. 

n मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर स्थिर होते. मात्र, युद्धामुळे तेलाच्या किमती पुन्हा भडकल्याचे दिसते. n देशात दरवर्षी जवळपास २२० लाख ते २४० लाख टन तेलाचा उपयोग करण्यात येतो. एकूण लागणाऱ्या तेलापैकी ६० ते ७०% खाद्यतेलाची आयात करावी लागते.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया