शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Russia-Ukraine Crisis: वाद त्यांचा अन् झळ तुमच्या खिशाला; पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:32 IST

Russia-Ukraine Crisis: सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे सरकारने इंधनाचे दर वाढवले नाहीत. पण, निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. या दोन देशांमधील वादाचा जगावर मोठा परिणाम पडतोय. भारतीयांनाही या युद्धाचा मोठा झटका लागू शकतो. रशिया-युक्रेन तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला करताच कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 103 डॉलरवर पोहोचल्या. गेल्या अडीच महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमती 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

विधानसभा निवडणुका संपताच...कच्चा तेलाच्या किमती वाढल्या, पण गेल्या अडीच महिन्यांत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही. सध्या पाच राज्यात निवडणुका असल्यामुळे वाढ होत नाहीये, पण उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका संपताच इधनाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 103 डॉलरवर पोहोचली आहे. यापूर्वी 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत $100 च्या वर गेली होती.

दर इतके वाढू शकतात3 नोव्हेंबरपासून देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पण तेव्हापासून कच्चे तेल प्रति बॅरल $20 पेक्षा महाग झाले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालले तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $120 पर्यंत जाऊ शकते.

15 रुपये वाढीची शक्यताअशा परिस्थितीत देशांतर्गत तेल कंपन्या डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रति लिटर 15 रुपयांनी वाढवू शकतात. ही वाढ एकाच वेळी न करता दोन-तीन टप्प्यांत केली जाण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या किमतीही वाढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत एलपीजी आणि सीएनजीच्या दरातही 10 ते 15 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

कधी वाढणार किंमतउत्तर प्रदेश आणि पंजाबसह 5 राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर तेल कंपन्या दर वाढवतील, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. निवडणुकीच्या काळात तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत नाहीत, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. भाव वाढल्याने सरकारचला राजकीय नुकसान सहन करावे लागू शकते. पण, निवडणुकीचा निकाल लागताच इंधनाच्या किमतीत वाढ होऊ शकते.

3 नोव्हेंबर रोजी सरकारने कर कमी केला होताकेंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करही कमी केला, त्यामुळे दर कमी झाले. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. तेव्हापासून कच्च्या तेलात लक्षणीय वाढ झाली आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $80 होती, जी आता प्रति बॅरल $103 च्या वर पोहोचली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाPetrolपेट्रोलDieselडिझेल