शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ब्रिटनमुळेच मल्ल्याच्या मालमत्ता गोठविणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 23:56 IST

कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या याच्यावर कारवाई करण्यास सीबीआय आणि भारतीय बँकांनी टाळाटाळच केली होती.

नवी दिल्ली : कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या याच्यावर कारवाई करण्यास सीबीआय आणि भारतीय बँकांनी टाळाटाळच केली होती. मल्ल्या याने स्वीस बँकेत केलेले पैशाचे हस्तांतरण ब्रिटिश सरकारने उघडकीस आणून भारताला अधिकृतरित्या कळविले; त्यामुळे मल्ल्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊन ब्रिटनमधील त्याच्या मालमत्ता गोठविता आल्या, अशी माहिती समोर आली आहे.नोव्हेंबर २0१५ मध्ये मल्ल्या लंडनहून दिल्लीला परतला, तेव्हा त्याला अटक करण्यात येऊ नये, असे लेखी आदेश सीबीआयने जारी केले होते. त्यानंतर चार महिन्यांनी मल्ल्या लंडनला पळाला, तेव्हा त्याला रोखण्यात यावे, असा कायदेशीर सल्ला बँकांना दिला गेला होता. परंतु बँकांनी तो मानला नाही. उलट विजय मल्ल्याला सुखेनैव देशाबाहेर जाऊ देण्यात आले.त्यानंतर जवळपास वर्षभराने लंडनमधील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विजय मल्ल्याचा स्वित्झर्लंडमधील एका बँकेत १७.८६ दशलक्ष पाउंड (१७0 कोटी रुपये) वळविण्याचा व्यवहार उघडकीस आणला. या व्यवहाराची माहिती ब्रिटिश वित्तीय गुप्तचर शाखेने २८ जून २0१७ रोजी भारताला अधिकृतरित्या दिली. त्यानंतर भारतातील १३ बँकांनी एकत्र येऊन समूह स्थापन केला आणि मल्ल्या याच्या मालमत्ता गोठविण्यासाठी ब्रिटनमध्ये खटला दाखल केला. त्यातून नोव्हेंबर २0१७ मध्ये मल्ल्या यांच्याविरुद्ध मालमत्ता गोठविण्याचा जागतिक आदेश बँकांना मिळाला.ब्रिटिशांच्या सल्ल्यानंतर हालचालीसूत्रांनी सांगितले की, मल्ल्या याने स्वीस बँकेत हस्तांतरित केलेल्या पैशांचा व्यवहार ब्रिटिश गुप्तचरांनी संशयास्पद कारवाया अहवालात (एसएआर) रूपांतरित केला. ही माहिती सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) रितसर कळविण्यात आली.त्यानंतर दोन्ही देशांच्या अधिकाºयांची एक बैठक झाली.सर्व मालमत्तांची विल्हेवाट लावण्याआधीच मल्ल्या याला रोखा, असा सल्ला ब्रिटिश अधिकाºयांनी बैठकीत दिला. त्यानुसार भारतीय तपास संस्था व बँकांनी हालचाली केल्या.स्वीस बँकेत जाणारे पैसे वेळेअभावी रोखता आले नाहीत, मात्र ब्रिटनधील १.१४ अब्ज पाउंडांची मल्ल्यांची मालमत्ता गोठविली गेली.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या