शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पंतप्रधान मोदींकडून उद्धव ठाकरेंना कोणतेही निमंत्रण मिळालेले नाही- संजय राऊत

By admin | Updated: March 26, 2017 20:40 IST

पंतप्रधान मोदींनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना 29 मार्च रोजीच्या एनडीए बैठकीच्या स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठवले

सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतील तणाव दूर करण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून पंतप्रधान मोदींनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना 29 मार्च रोजीच्या एनडीए बैठकीच्या स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठवले, अशी चर्चा राजधानी दिल्लीत सुरू आहे. तथापि असे कोणतेही निमंत्रण अधिकृतरीत्या शिवसेना प्रमुखांना प्राप्त झालेले नाही अथवा पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंना तसा फोनही केलेला नाही, असा खुलासा निसंदिग्ध शब्दात शिवसेनेचे राज्यसभेतील प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी लोकमतशी बोलताना केला.संभाव्य निमंत्रणाबाबत मिश्कील शैलीत बोलताना संजय राऊत म्हणाले, तूर्त तरी केवळ चर्चेत असलेले हे निमंत्रण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मागण्यासाठी असेल तर ही चर्चा आणि स्नेहभोजन मातोश्रीवरच होईल. याचे कारण यापूर्वीच्या दोन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्याची सारी चर्चा मातोश्रीवरच झाली होती. तथापि शिवसेनाच काय तर एनडीएच्या कोणत्याही घटक पक्षाच्या नेत्याला आजवर माझ्या माहितीनुसार पंतप्रधानांकडून असे निमंत्रण प्राप्त झालेले नाही. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर देखील भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी आघाडीतील दोन प्रमुख पक्षांमधले ताणतणाव अद्याप दूर झालेले नाहीत. प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवल्यामुळे भाजपामध्ये कमालीची नाराजी आहे. शिवसेनेच्या कडवट हल्ल्यांमुळे भाजपा वैतागला असून राज्यात लवकरात लवकर उभय पक्षांची युती संपावी, अशी काही नेत्यांची मनोमन इच्छा आहे, असे समजले. तथापि याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त न करता अतिशय सावध पवित्रा भाजप नेत्यांनी स्वीकारला आहे. मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच एक बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. बैठकीने राज्य सरकारवर शिवसेनेद्वारे सातत्याने सुरू असलेल्या शरसंधानाची गंभीर दखल घेतली व अन्य पर्यायांवरही चर्चा केल्याचे समजले. तथापि शिवसेनेशी असलेल्या युतीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, २९ मार्चच्या प्रस्तावित स्नेहभोजनासाठी पंतप्रधान मोदींचे उद्धव ठाकरेंना येऊ घातलेले निमंत्रण, हा उभय पक्षात सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी भाजपतर्फे एक महत्त्वाचा की (अखेरचा) प्रयत्न असावा, असे बोलले जाते. महाराष्ट्र विधानसभेत २८८ सदस्यांच्या सभागृहात भाजपाचे १२२ सदस्य आहेत. बहुमतासाठी भाजपाला २३ मतांची कमतरता आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण २0 सदस्य आहेत. यापैकी १३ सदस्यांचा पाठिंबा भाजपाला आहे. याचा अर्थ आणखी फक्त १0 आमदारांच्या पाठिंब्याची भाजपाला आवश्यकता आहे. युती तोडून शिवसेनेच्या ६३ आमदारांच्या पाठिंब्याला तिलांजली देण्यापूर्वी राज्यात अन्य कोणते पर्याय भाजपाकडे उपलब्ध आहेत, याची चाचपणी सुरू असतानाच, पंतप्रधान मोदी ठाकरेंना खास निमंत्रण पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने हा घटनाक्रम अधिकच लक्षवेधी बनला आहे.