शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

तडजोड केली म्हणजे शेपूट घातले नाही- उद्धव ठाकरे

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

मुंबई-माझा महाराष्ट्र अस्थिर होऊ नये याकरिता सत्तेत सहभागी होण्याची तडजोड स्वीकारली म्हणजे शिवसेनेने शेपूट घातलेली नाही. आम्ही सरकारजमा झालेलो नाही. राज्यातील हे भाजपाचे सरकार जनतेशी अन्यायाने वागत असेल तर त्या सरकारवर पहिला वार शिवसेनाच करील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. देशातील भाजपा सरकारला संपूर्ण बहुमत असतानाही काश्मीरबाबतचे ३७० वे कलम रद्द का होत नाही आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल करीत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले.

मुंबई-माझा महाराष्ट्र अस्थिर होऊ नये याकरिता सत्तेत सहभागी होण्याची तडजोड स्वीकारली म्हणजे शिवसेनेने शेपूट घातलेली नाही. आम्ही सरकारजमा झालेलो नाही. राज्यातील हे भाजपाचे सरकार जनतेशी अन्यायाने वागत असेल तर त्या सरकारवर पहिला वार शिवसेनाच करील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. देशातील भाजपा सरकारला संपूर्ण बहुमत असतानाही काश्मीरबाबतचे ३७० वे कलम रद्द का होत नाही आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल करीत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले.
शिवसेनाप्रमुख यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. त्यानंतर दादर शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकापाशी बसवलेल्या प्रेरणा ज्योतीचे प्रज्वलन ठाकरे यांनी केले. ठाकरे म्हणाले की, आता आपण कुणाच्या मेहरबानीवर नाही. कुठल्याही लाटेवर तरंगणारे ओंडके नाही. हिंदूंना दहा बालकांना जन्म देण्याचा उपदेश करणार्‍या भाजपा नेत्यांना या मुलांना पोसणार कोण, असा सवाल करून ते म्हणाले की, केवळ मते टाकायला मेंढरांची पैदास नको. दुनिया हलवणारा एकच मुलगा पुरेसा आहे. घरवापसीचे आंदोलन करणार्‍या संघ परिवाराच्या नेत्यांना ठाकरे यांनी खडे बोल सुनावले. काश्मीरमधील पंडितांची घरवापसी का झाली नाही? वाजपेयी सरकारची परिस्थिती वेगळी होती. मात्र आता बहुमताचे सरकार असताना ३७०वे कलम, समान नागरी कायदा याबाबत भूमिका का घेतली जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
.......................................
बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता उंबरठे झिजवणार नाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक म्हणजे त्यांचा केवळ पुतळा नव्हे. माझ्या कल्पनेतील स्मारक उभे करण्याकरिता मी कुणाचे उंबरठे झिजवणार नाही किंवा वाडगा घेऊन फिरणार नाही. दिमाखाने व शानदारपणे स्मारक उभे राहणार असेल तर होऊ द्या, असे उदगार ठाकरे यांनी काढले.
...........................................
संजय दत्तचे फर्लो की फिरलो आणि परत गेलो
एकेकाळी शिवसेनाप्रमुखांनी अभिनेता संजय दत्तची पाठराखण केली होती. त्याच दत्तला भाजपा सत्तेत मिळत असलेला हा फर्लो आहे की फिरलो आणि परत आत गेलो आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. देशद्रोहाचा खटला असलेला आत-बाहेर कसा, असे ते म्हणाले.