शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

उदयनराजे शपथेवेळी म्हणाले 'जय भवानी, जय शिवाजी'; व्यंकय्या नायडूंनी दिली समज, नेटिझन्स चिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 23:25 IST

खासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शपथेशेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली

ठळक मुद्देखासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शपथेशेवटी‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली

मुंबई -राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज शपथ घेतली. कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्रम राज्यसभेत न होता, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात सकाळी ११ वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. राज्यसभा खासदारांच्या या शपथविधी सोहळ्यात भाजपा नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी शपथ पूर्ण झाल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असे म्हटले होते. त्यावरुन, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. 

देशातील 20 राज्यांमधून निवडून आलेल्या 62 खासदारांनी आज खासदारकीची शपथ घेतली. त्यामध्ये, महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरपीआयचे रामदास आठवले, भाजपा नेते उदयनराजे भोसले, काँग्रेस नेते राजीव सातव आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही खासदारकीची शपथ घेतली. व्यंकय्या नायडू यांच्या दालनात नवनिर्वाचित या खासदारांचा शपथविधी संभारंभ सोहळा पार पडला. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे मोजक्याच सदस्यांना शपथ देण्यात आली.

खासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शपथेशेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली. उदयनराजेंनी शपथ घेताना दिलेल्या घोषणेवरून सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली. व्यंकय्या नायडू म्हणाले, ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही. त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. नो अदर स्लोगन आर अलाऊड इन द हाऊस, कीप दॅट इन माईंड, नीव मेंमर फॉर फ्युचर, असे व्यंकय्या नायडूंनी म्हटले. 

उदयनराजे भोसले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शपथविधीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर, सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल होत असून व्यंकय्या नायडूंचा शिवभक्तांकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. व्यकंय्या नायडूंनी उदयनराजेंना दिलेली समज शिवभक्तांना रुचली नसून त्यांनी नायडू यांचा फेसबुकवरुन व सोशल मीडियातून तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसलेंनी खासदारकीची शपथ घेण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरुन न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी पवारांना लक्ष्य केले. 'भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात सर्व जातींमध्ये सलोखा राहिला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या विचाराचे स्वतंत्र आहे', असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत विधानावर साधारण प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूMumbaiमुंबईMember of parliamentखासदार