शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

उदय कोटक यांनी समभाग विकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 04:39 IST

समभाग विक्रीसाठी कोटक सिक्युरिटीज मॉर्गन स्टॅन्ले व गोल्डमन सॅक्स या कंपन्यांनी मध्यस्थांचे काम केले.

विशेष प्रतिनिधी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विख्यात उद्योगपती उदय कोटक यांनी त्यांचे कोटक महिन्द्रा बँकेतील २.८० टक्के समभाग प्रायव्हेट प्लेसमेंट (खासगी सौद्याद्वारे) विकले आहे. रिझर्व्ह बँकेने खासगी बँकांच्या प्रवर्तकांना आपले भांडवल कमी करण्याचा आदेश दिल्यामुळे कोटक यांनी हे पाऊल उचलले आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

या समभाग विक्रीसाठी कोटक सिक्युरिटीज मॉर्गन स्टॅन्ले व गोल्डमन सॅक्स या कंपन्यांनी मध्यस्थांचे काम केले. कोटक महिन्द्रा बँकेच्या प्रत्येक शेअरसाठी १२१५ ते १२४० ही विक्री किंमत ठेवण्यात आली होती. या २.८० टक्के समभागातून ६८०० कोटी कोटक यांना मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.रिझर्व्ह बँकेने खासगी बँकांच्या प्रवर्तकांनी आपले भांडवल तीन वर्षांत ४० टक्के,दहा वर्षांत २० टक्के आणि १५ वर्षांत १५ टक्क्यांवर आणण्याचा आदेश दिला आहे. या समभाग विक्रीनंतर कोटक यांच्याकडे कोटक महिन्द्रा बँकेचे २६.१० टक्के भांडवल शिल्लक राहिले आहे.त्यापैकी ०.१० टक्के भांडवल कोटक यांना सप्टेंबर २०२० पर्यंत विकून स्वत:चा मालकी हिस्सा २६ टक्के करायचा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :share marketशेअर बाजार