शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Udaipur Murder: उदयपूर हत्याकांड; कन्हैयालाल यांच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी, अशोक गहलोत यांची घोषणा

By ओमकार संकपाळ | Updated: July 6, 2022 21:44 IST

राजस्थानच्या जयपूरमध्येमध्ये कन्हैयालाल यांची दुकानात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

जयपूर:राजस्थानच्या जयपूरमध्येमध्ये काही दिवसांपूर्वी कन्हैयालाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मुलांच्या भविष्याबाबत राजस्थान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारने कन्हैयालाल तेली यांचे पुत्र यश आणि तरुण यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. नियुक्तीसाठी त्यांनी नियमात शिथिलता आणली आहे. ही नियुक्ती राजस्थान अधीनस्थ कार्यालय लिपिक सेवा (सुधारणा) नियम, 2008 आणि 2009 च्या नियम 6C अंतर्गत प्रदान केली जाईल.

शिंपी कन्हैयालाल यांची उदयपूर येथील त्यांच्या दुकानात हत्या करण्यात आली होती. यानंतर 30 जून रोजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत कुटुंबीयांना भेटायला आले होते. त्यावेळी राज्य सरकारकडून कुटुंबाला 51 लाखांचा धनादेशही देण्यात आला. यासोबतच दोन्ही मुलांना नोकरी देण्याचेही सांगण्यात आले.

गेहलोत यांचा भाजपवर निशाणासीएम गेहलोत म्हणाले की, कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना आमच्या पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. या भीषण घटनेबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली जावी म्हणून मी जोधपूरमधील माझा संपूर्ण कार्यक्रम सोडून जयपूरला परत आलो. पण या बैठकीऐवजी हैदराबादला त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीला जाणे भाजपच्या नेत्यांनी योग्य मानले. आमच्या तपासात आम्ही आतापर्यंत कोणतीही कमतरता ठेवली नाही. असे असूनही ते लोकांना भडकावण्यात मग्न आहेत. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत या दहशतवादी घटनेच्या निषेधार्थ निषेध प्रस्तावही मंजूर झाला नाही.

आरोपी पोलीस कोठडीतकन्हैयालाल हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणखी एका आरोपीला एनआयएने विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत एनआयएकडे पाठवले आहे. सूत्रांनी सांगितले की, वसीम अलीला मंगळवारी कट रचल्याप्रकरणी आणि कन्हैयाच्या दुकानाची रेकी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद यांना घटनेच्या काही तासांनंतर अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी