जयपूर- राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये पाठवणी केल्यानंतर सासरी परतणाऱ्या नववधूचं फिल्मी स्टाइल अज्ञात लोकांनी अपहरण केलं आहे. नववधूला पळवताना त्या अज्ञातांनी नवरदेवाला मारहाणही केली आहे. या घटनेनंतर लग्न झालेल्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री तितरडी भागात एक लग्न समारंभ होता. लग्न लागल्यानंतर नववधूची पाठवणी करण्यात आली. नववधू नवरदेवाबरोबर चिंतामणच्या घाटीवर पोहोचली, त्याचदरम्यान सविना रेल्वे फाटकाजवळ त्यांच्या कारला थांबवलं. त्या अज्ञातांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली आणि नवरदेवाला मारहाण केली. त्यानंतर नववधूला स्वतःबरोबर ते अपहरणकर्ते घेऊन गेले. हा प्रकार समजल्यानंतर त्या नवरदेवाचं कुटुंब घटनास्थळी दाखल झालं आहे.
सासरी जातानाच नववधूचं फिल्मी स्टाइल अपहरण, उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 11:59 IST