शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:47 IST

UCO Bank Fraud Case: युको बँक फसवणूक प्रकरणातून व्यावसायिक अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास विशेष सीबीआय न्यायालयाने नकार दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : युको बँक फसवणूक प्रकरणातून व्यावसायिक अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास विशेष सीबीआय न्यायालयाने नकार दिला. या गुन्ह्यात लोढा यांचा ‘सक्रिय सहभाग’ असल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदविले.

टॉपवर्थ स्टील्स अँड पॉवर प्रा. लि आणि टॉपवर्थ ग्रुपचे प्रवर्तक आणि एमडी असलेल्या लोढा यांनी सहआरोपी व बँकेच्या अधिकाऱ्यांसह युको बँकेची ७४.८२ कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा कट रचला होता, असा आरोप सीबीआयने केला आहे.

गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाचे न्या. व्ही. पी. देसाई यांनी लोढा यांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला. त्यावेळी न्यायालयाने म्हटले की, ‘लोढा हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांच्या सहभागाशिवाय हा गुन्हा घडणे शक्य नाही.’ तर, गुन्ह्याच्या सर्व टप्प्यांवर लोढा यांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसते,  असे मंगळवारी उपलब्ध झालेल्या आदेशाच्या प्रतीमध्ये नमूद केले आहे.

सीबीआयने २०१८ मध्ये लोढा आणि अक्षता मर्केंटाईल प्रा.लि. या फर्मच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केला. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, टॉपवर्थ ग्रुप कंपनी व  ‘एएमपीएल’ने ७४.८२ कोटी रुपये अन्य कंपन्यांकडे वळविले. त्यातील ४३ लाख रुपये अभय लोढा व अश्विनी लोढा यांच्या नावे असलेल्या गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी वापरण्यात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँक