शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हवाई टॅक्सी विकसित करण्यासाठी उबेरची नासासोबत भागीदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 03:50 IST

हवाई टॅक्सी (फ्लाइंग टॅक्सी) विकसित करण्याच्या प्रकल्पात उबेरने अमेरिकी आंतराळ संस्था नासाशी भागीदारी केली आहे.

लॉस एंजेलिस : हवाई टॅक्सी (फ्लाइंग टॅक्सी) विकसित करण्याच्या प्रकल्पात उबेरने अमेरिकी आंतराळ संस्था नासाशी भागीदारी केली आहे. उत्तम दर्जा आणि कमी किंमत हे निकष नजरेसमोर ठेवून ही टॅक्सी विकसित करण्यात येणार आहे.उबेरने जारी केलेल्या माहितीनुसार, यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘उबेरएअर’ प्रकल्पात लॉस एंजेलिस शहराचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डलास फोर्थ-विथ आणि दुबई यांचा या प्रकल्पात आधीच समावेश झालेला आहे. कॅलिफोर्निया आणि टेक्सास हे अमेरिकेतील सर्वाधिक कार असलेले प्रांत आहेत.उबेरच्या निवेदनात म्हटले आहे की, नासाच्या मानवरहित वाहतूक व्यवस्थापन (यूटीएम) प्रकल्पात उबेर सहभागी झाली आहे. अमेरिकेच्या निवडक शहरात २०२० पर्यंत प्रदर्शनी हवाई टॅक्सी सुरू करण्याचे लक्ष्य ‘उबेरएअर’ने ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी नासासोबतची भागीदारी लाभदायक ठरेल. नासासोबतच्या भागीदारीतून आणखीही काही संधी शोधण्याची उबेरची इच्छा आहे. त्यातून नागरी हवाई वाहतुकीची नवी बाजारपेठ निर्माण होईल.उबेरच्या योजनेनुसार, हवाई टॅक्सी सेवेचे पहिले प्रात्यक्षिक २०२० मध्ये घेतले जाईल. २०२३ पर्यंत ही सेवा व्यावसायिक पातळीवर सुरू होईल. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे आॅलिम्पिक खेळ होणार आहेत. त्याआधीच ही सेवा पूर्णत: सुरू झालेली असेल. त्यासाठी भरपूर वेळही कंपनीकडे आहे.उबेरचे प्रवक्ते मॅथ्यू विंग यांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात हवाई टॅक्सीमध्ये पायलट असेल. नंतर मात्र ही सेवा पूर्णत: स्वयंचलित असेल. लॉल एंजेलिस विमानतळ आणि स्टेपल्स सेंटर संकुल या मार्गावरील प्रवास हवाई टॅक्सी २७ मिनिटांत पूर्ण करील. कार प्रवासाच्या तुलनेत हा वेळ तिपटीने कमी आहे.सध्याच्या उबेर कार टॅक्सी ज्याप्रमाणे अ‍ॅपच्या माध्यमातून बुक करण्यात येतात, तशाच हवाई टॅक्सीही बुक करता येतील.उबेरने म्हटले की, प्रस्तावित हवाई टॅक्सी इलेक्ट्रिक वाहन असेल. त्याचे उड्डाण (टेक-आॅफ) आणि जमिनीवरील अवतरण (लँडिंग) हेलिकॉप्टरसारखे व्हर्टिकल पद्धतीचे असेल.म्हणजेच त्याला विमानासारखे लांबवर धावण्याची गरज भासणार नाही. हे वाहन हेलिकॉप्टरपेक्षा मात्र पूर्णत: भिन्न असेल.ते अधिक सुरक्षित असेल, लवकर उंची पकडणारे आणि परवडणारेही असेल. सामान्य टॅक्सीच्या दरात ही सेवा देण्याची कंपनीची योजना आहे.

टॅग्स :Uberउबर