शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

२ वर्ष पडून होता मनपाचा बुलडोझर दुरुस्तीसाठी २ वर्ष प्रतीक्षा : अखेर भंगारात जमा; पुण्याहून सुटा भाग आलाच नाही

By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST

जळगाव: घनकचरा प्रकल्पावर कचरा डम्पींगसाठी दिलेला मनपाचा बुलडोझर दुरुस्तीसाठी पुण्याला पाठविलेला गिअरचा भाग परतच न आल्याने तब्बल २ वर्षांपासून प्रकल्पस्थळीच पडून अखेर भंगारात जमा झाला आहे.

जळगाव: घनकचरा प्रकल्पावर कचरा डम्पींगसाठी दिलेला मनपाचा बुलडोझर दुरुस्तीसाठी पुण्याला पाठविलेला गिअरचा भाग परतच न आल्याने तब्बल २ वर्षांपासून प्रकल्पस्थळीच पडून अखेर भंगारात जमा झाला आहे.
एमआयडीसीतील फायर स्टेशन येथे सुरक्षित स्थळी हा बुलडोझर अखेर हलविण्यात आला आहे.
मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे अनेक किस्से समोर येत असतात. वाहन विभागाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक किस्सा समोर आला आहे. मनपाने कचरा डम्पींगसाठी हंजीर बायोटेक प्रकल्पावर दिलेला बुलडोझर गिअरमध्ये बिघाड झाल्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी बंद पडला. त्याचा तो खराब झालेला भाग दुरुस्तीसाठी वाहन विभागाने पुण्याला पाठविला. तोपर्यंत हे बुलडोझर व्यवस्थितपणे कार्य करीत होते. पुण्याहून तो सुटा भाग किमान दोन-तीन महिन्यात परत येणे अपेक्षित होते. मात्र तब्बल दोन वर्ष उलटली तरीही तो सुटा भाग आलाच नाही. वाहन विभागानेही लक्ष दिले नाही. त्यामुळे हे बुलडोझर हंजीर प्रकल्पस्थळीच पडून राहिले. उन पावसात सापडून गंजून गेले.
वाहन विभाग प्रमुख म्हणून अभियंता सुनील भोळे यांनी पदभार घेतल्यावर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने शहर अभियंता यांना ही बाब निदर्शनास आणून देत हा बुलडोझर तेथून सुरक्षित स्थळी हलविणे अपेक्षित असल्याचे सांगितले.
शहर अभियंता थोरात यांनी १५ ऑक्टोबर रोजी हंजीर प्रकल्पस्थळी जाऊन या बुलडोझरची पाहणी केली. तसेच तातडीने हे बुलडोझर एमआयडीसीतील अग्नीशमन केंद्राच्या आवारात हलविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ट्रकवर ठेवून हे बुलडोझर तेथे हलविण्यात आले.
---- इन्फो---
कालबा‘ झाला
हा बुलडोझर गिरणा पंपींग कार्यान्वित असताना गिरणेत वाळूचा बंधारा घालण्यासाठी वापरला जात होता. त्यानंतर तो हंजीर प्रकल्पावर देण्यात आला. १५-१६ वर्ष झाल्याने हा बुलडोझर कालबा‘ झाल्याचे मनपा वाहन विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
---- इन्फो---
इतर सुट्या भागांची चोरी
हा बुलडोझर दोन वर्ष बेवारस पडून राहिल्याने त्याच्या काही सुट्या भागांची चोरी झाली असून आता परत हा बुलडोझर सुरू करणे अवघड झाले आहे. त्यामुळे हा बुलडोझर आता भंगारातच काढावा लागणार असल्याचे समजते.