शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा 109 तासांनी बाहेर काढल्यानंतर मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 09:32 IST

बोअरवेलमध्ये पडलेला दोन वर्षीय मुलगा फतेहवीर सिंह याला तब्बल 109 तासांनी बाहेर काढण्यात यश आलं होतं.

संगरुरः बोअरवेलमध्ये पडलेला दोन वर्षीय मुलगा फतेहवीर सिंह याला तब्बल 109 तासांनी बाहेर काढण्यात यश आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याला जीव गमवावा लागला आहे. फतेहवीर नावाचा हा दोन वर्षांचा मुलगा गुरुवारी संध्याकाळी 150 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. पंजाबमधल्या भगवानपुरा गावात कोरड्याठाक पडलेल्या या बोअरवेलला कपड्यानं झाकून ठेवण्यात आलं होतं. फतेहवीर खेळता खेळता जाऊन त्या बोअरवेलमध्ये पडला.सुरुवातीला त्याच्या आईनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या मातेचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती मिळताच त्याच्या मदतीसाठी बचाव पथक आले. बचाव पथक रविवारपर्यंत मुलाच्या जवळपास पोहोचलं होतं. परंतु त्याला बाहेर काढण्यात त्यांना सातत्यानं अपयश येत होतं.कारण काही तांत्रिक अडचण आली होती. तो चिमुकला दोन दिवस अन्न-पाण्यावाचून होता. पण त्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. त्यानंतर बचाव पथकाच्या मदतकार्यात एनडीआरएफ, पोलीस, नागरी प्रशासन, ग्रामीण आणि स्थानिक सहभागी झाले.उकाड्यानं हैराण होऊन सुद्धा त्या चिमुकल्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. मुलाला वाचवण्यासाठी त्या बोअरवेलला समांतर असणारी दुसरी बोअरवेलही खोदण्यात आली. त्यात 36 व्यासाचा पाईप टाकण्यात आला. या नव्या बोअरवेलच्या माध्यमातून आज सकाळी मुलाला बाहेर काढण्यात आलं.