दोन महिलांचा ऐवज हिसकावला
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
पुणे : गेल्या काही दिवसात शहरामध्ये सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून रस्त्याने पायी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या. याप्रकरणी लष्कर आणि सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन महिलांचा ऐवज हिसकावला
पुणे : गेल्या काही दिवसात शहरामध्ये सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून रस्त्याने पायी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या. याप्रकरणी लष्कर आणि सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार पेठेमध्ये राहणा-या ४५ वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही महिला लष्कर परीसरातील कॉन्व्हेंट रस्त्यावरुन पायी जात होती. त्या हुसेनी बागेजवळ आल्या असता मोटारसायकलवरुन आलेल्या दोघाजणांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजारांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. तर सांगवीमध्ये १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास पिंपळे निलख येथे राहणा-या ६० वर्षीय महिलेचे ४५ हजारांचे मंगळसुत्र हिसकावले गेले. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही महिला सांगवीमधील विशालनगर भागातील डी. पी. रस्त्याने मुलीसोबत पायी जात होती. त्यावेळी आरोपींनी त्यांचे मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेले.