शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी मशिनमध्ये अडकून दोन महिला ठार, बेळगाव जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:14 IST

अथणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद

शिरगुप्पी : अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या शेतात बुधवारी दुपारी ऊसतोडणी सुरू असताना ऊसतोडणीच्या आधुनिक मशीनमध्ये अडकून दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. बौराव्वा लक्ष्मण कोबडी (वय ६०) आणि लक्ष्मीबाई मल्लप्पा रुद्रगौडर (वय ६५, रा. सत्ती) अशी मृत महिलांची नावे आहेत. याबाबत अथणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद झाली आहे.याबाबत घटनास्थळी मिळालेली व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. सत्ती गावच्या हद्दीतील काडगौडा पाटील यांच्या शेतात दुपारी दोनच्या सुमारास आधुनिक मशीनद्वारे ऊसतोडणी सुरू होती. काही मजूर व महिला शेतात कार्यरत होते. बौराव्वा कोबडी आणि लक्ष्मीबाई रुद्रगौडर या दोघी मजुरीसाठी सकाळीच आल्या होत्या. आधुनिक मशीनद्वारे ऊसतोडणी दुपारच्या सुमारास सुरू होती. तोडलेला ऊस मशीनच्या मागील भागात गोळा करण्याचे काम या दोघी महिला करत होत्या. यावेळी सुरू असलेल्या मशीनचा अंदाज त्यांना आला नाही. दोन्ही महिला मशीनच्या मागील भागात अडकल्या. मशीनमध्ये अडकल्यानंतर गंभीररीत्या जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तत्काळ मशीन बंद करण्यात आली. तोपर्यंत महिला चिरडून मृत झाल्या होत्या. या घटनेनंतर मृत महिलांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दोघींचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.या घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या दुर्घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याबाबत हालचाली सुरू होत्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Two women killed in sugarcane harvester accident in Belgaum.

Web Summary : Two women laborers died in Belgaum's Athani taluka after getting trapped in a sugarcane harvesting machine. The accident occurred in Kadgouda Patil's field in Satti village while the women were collecting cut sugarcane behind the machine. They died on the spot.