दिल्लीमेट्रोलादिल्लीकरांची लाईफलाईन म्हटलं जातं पण आजकाल ही मेट्रो प्रवाशांसाठी मनोरंजनाचं साधन बनत आहे. दिल्ली मेट्रोमध्ये लोकांना केवळ प्रँक, डान्स, कपल्स रोमान्स नव्हे तर मारामारीचे व्हिडीओ देखील पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमध्ये दोन महिलांमधील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
सोशल मीडियावर एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला होता आणि तेव्हापासून हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन महिला प्रवासी भिडल्या आणि एकमेकींच्या जीवावर उठलेल्या दिसत आहेत. दोघीही सीटसाठी भांडताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहून असं दिसतं की मेट्रोमध्ये जास्त प्रवासी नाहीत. तरीही या दोघी भांडत आहेत. एका प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे आणि तो शेअर केला आहे.
व्हिडीओ पाहता असं दिसतं की, मेट्रो मोठ्या प्रमाणात रिकामी आहे आणि दोन महिला एकमेकींचे केस ओढत भांडत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला एक महिला सीटवर पडलेली दिसते आणि दुसरी महिला तिच्यावर रागाने ओरडताना दिसत आहे. दोघीही एकमेकींना मारताना दिसत आहेत. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.