शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:35 IST

जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीना काही समस्या असतात. पण, काहींच्या समस्या अशा असतात की, ज्या ऐकून समोरच्यालाही कपाळावर हात मारून घ्यावा वाटतो.

जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीना काही समस्या असतात. पण, काहींच्या समस्या अशा असतात की, ज्या ऐकून समोरच्यालाही कपाळावर हात मारून घ्यावा वाटतो. असाच एक प्रकार मध्य प्रदेशमधून समोर आला आहे. मध्य प्रदेशातील खंडवा येथे सुरू असलेल्या एका सार्वजनिक सुनावणीत एक अत्यंत अनपेक्षित आणि तितकीच धक्कादायक घटना घडली. जिल्हाधिकारी ऋषभ कुमार गुप्ता यांच्यासह सर्व उच्च अधिकारी उपस्थित असताना, एका भिकाऱ्याने अशी तक्रार केली की ऐकणाऱ्या प्रत्येकाला धक्काच बसला.

नेमकी काय आहे तक्रार?शफीक शेख नावाचा एक दिव्यांग भिकारी सुनावणीत पोहोचला. त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्याला दोन पत्नी आहेत आणि त्या दोघी सतत भांडत असल्याने त्याच्या भिक मागण्याच्या कामावर परिणाम होत आहे. शफीकने म्हटले की, त्याला दोन्ही पत्नींना सोडायचे नाही, उलट त्यांना एकाच छताखाली एकत्र राहायला शिकवायचे आहे.

कलेक्टरही झाले अवाक!शफीकचे हे म्हणणे ऐकून जिल्हाधिकारी ऋषभ कुमार गुप्ता यांना धक्का बसला. जनसुनावणीसाठी उपस्थित असलेले इतर विभागांचे अधिकारीही काही काळ स्तब्ध झाले. शफीकने सांगितले की, त्याचे पहिले लग्न २०२२ मध्ये शबानासोबत झाले होते, तर दुसरे लग्न २०२४ मध्ये फरीदासोबत झाले. शफीक अंध असून, तो खंडवा आणि महाराष्ट्रादरम्यान धावणाऱ्या ट्रेन आणि बसमध्ये भीक मागून आपला उदरनिर्वाह करतो.

उत्पन्नावर होतोय परिणामशफीकच्या म्हणण्यानुसार, तो भीक मागून दररोज दोन ते तीन हजार रुपये कमावतो आणि दोन्ही पत्नींची काळजी घेण्यास तो सक्षम आहे. परंतु, त्यांच्यातील सततच्या भांडणामुळे त्याला भीक मागण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे त्याच्या कमाईवर परिणाम होत आहे. म्हणूनच, त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणात हस्तक्षेप करून पत्नींना समजावण्याची विनंती केली.

कलेक्टरचा अनोखा उपायभिकाऱ्याची ही अनोखी तक्रार ऐकून जिल्हाधिकारी सुरुवातीला काही क्षण स्तब्ध झाले, पण नंतर हसत हसत त्यांनी हे प्रकरण महिला आणि बालविकास विभागाकडे चौकशीसाठी पाठवले. शफीकच्या दोन्ही पत्नींना बोलावून त्यांचे समुपदेशन करावे आणि त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBeggerभिकारीJara hatkeजरा हटके