बिहारमधील सहरसा येथे एका विवाहित पुरुषाने त्याची पहिली पत्नी जिवंत असताना त्याच्या प्रेयसीशी लग्न केलं, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. दोन्ही पत्नींनी पोलिस ठाण्यात धाव घेत एकमेकींशी जोरदार भांडण केलं. हे प्रकरण पुढे हाणामारीपर्यंत पोहोचलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी केली. यानंतर प्रेयसीचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला.
पातरघाट पोलीस स्टेशन परिसरातील भद्दी येथील रहिवासी निरंजन कुमार सिंह यांनी त्यांची मुलगी छवी प्रियाच्या बेपत्ता होण्याबाबत सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांना सांगितलं की, त्याची मुलगी छवी प्रिया तिच्या बहिणीसोबत १० जानेवारी रोजी एमएलटी कॉलेजचा फॉर्म भरण्यासाठी आली होती. पण तिला दुसऱ्या दिवशी कॉलेजला येण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर तिने बहिणीला घरी पाठवलं आणि फोनही बंद केला.
पोलिसांनी मुलीचा शोध घेतला तेव्हा नवहट्टा पोलीस स्टेशन परिसरातील मोहनपूर येथील रहिवासी सोनू झा याच्यासोबत तिचं लग्न झाल्याचं समोर आलं. यानंतर सोनू आधीच विवाहित असल्याचं समोर आलं. सोनूची पहिली पत्नी कल्पना हिला हे कळताच तिने सोमवारी सदर पोलीस स्टेशन गाठलं. गोंधळ घालायला सुरुवात केली.
कल्पनाने सांगितलं की, तिचं २०२१ मध्ये लग्न झालं आहे. सोनूचे वडील सुपौलमधील कोसी प्रकल्पात काम करतात. तिला चार वर्षांचा मुलगा देखील आहे. तिचा नवरा तिला अनेकदा मारहाण करायचा. या संदर्भात तिने अनेकदा तक्रार केली होती. पण प्रत्येकवेळी तिची त्यांच्यात समेट घडवून आणला जात होता.
स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, तरुण आणि तरुणी फेसबुकवर प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्न केलं. या संपूर्ण प्रकरणात पोलीस स्टेशनचे प्रमुख सुबोध कुमार म्हणाले की, न्यायालयात जबाब दिल्यानंतर मुलीने सांगितलं की तिला तिच्या प्रियकरासोबतच राहायचं आहे.