फर्ग्युसन रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विलास गुनाजी शिंदे (वय ५०, रा. नाशिक फाटा, कासारवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना बुधवारी रात्री अज्ञात वाहनाने त्यांना फर्ग्युसन रस्त्यावरील दीनदयाळ रुग्णालयासमोर धडक दिली. डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाल्यामुळे शिंदे यांचा मृत्यू झाला.
फर्ग्युसन रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार ठार
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विलास गुनाजी शिंदे (वय ५०, रा. नाशिक फाटा, कासारवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना बुधवारी रात्री अज्ञात वाहनाने त्यांना फर्ग्युसन रस्त्यावरील दीनदयाळ रुग्णालयासमोर धडक दिली. डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाल्यामुळे शिंदे यांचा मृत्यू झाला.---