शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

मारहाण करुन दुचाकी व मोबाईल लांबविणार्‍या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:03 IST

फोटो सचिन

फोटो सचिन
जळगाव : दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून त्याला मारहाण करुन त्याच्या ताब्यातील दुचाकी व मोबाईल हिसकावून नेणार्‍या तंजीम बेग नसीम बेग मिर्झा व किरण रामदास चव्हाण (दोन्ही रा.तांबापुरा, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडून चोरलेली दुचाकी व मोबाईल असा ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राजेश रावजी घोणमोडे (वय २८ रा.भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजी नगर जळगाव, मुळ रा.नागपूर) हा सोमवारी रात्री पावणे बारा वाजता कपंनीतून घरी जात असताना पंचमुखी हनुमान मंदिराजवळ दोन तरुणांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली होती. त्याच्या ताब्यातील २५ हजार रुपये किमतीची दुचाकी व २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल या दोघांनी पळविला होता.या घटनेनंतर राजेश प्रचंड घाबरला होता. त्यामुळे त्याने दोन दिवस कुठेच वाच्यता केली नाही.भीतीतून सावरल्यानंतर राजेश याने शुक्रवारी रात्री दहा वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
रात्रभर चालली शोध मोहीम
संशयिताच्या वर्णनावरुन पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी रात्रीच गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक एन.बी.सुर्यवंशी, सहायक फौजदार रत्नाकर झांबरे,हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, संदीप पाटील, शशिकांत पाटील, मनोज सुरवाडे, विजय पाटील, किशोर पाटील व नितीन बाविस्कर आदींचे पथक आरोपींच्या शोधासाठी पाठविले. या पथकातील प्रत्येकाने आपआपल्या खबर्‍यामार्फत माहिती काढून रात्रीच मोहीम राबवून पहाटेच्या सुमारास दोघांना तांबापुरातून ताब्यात घेतले. दोघांना गुन्‘ाची कबुली देत मुद्देमालही काढून दिला.