शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

कारची काच फोडून दुचाकीस्वारांनी लाखाची रोकड पळविली

By admin | Updated: March 23, 2017 17:16 IST

टिळकरोडवरील घटना : कारचालकावर पाळत ; लक्ष विचलित करून बॅग लंपास

टिळकरोडवरील घटना : कारचालकावर पाळत ; लक्ष विचलित करून बॅग लंपास
नाशिक : बँकेतून पैसे काढून परतलेल्या कारचालकाचे लक्ष विचलित करून पल्सर दुचाकीवरील दोघा संशयितांनी कारची काच फोडून एक लाख रुपये ठेवलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास टिळकरोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर घडली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास रहाडे यांनी दुपारच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील एका बँकेतून एक लाख रुपयांची रोकड काढली़ यानंतर रहाडे व त्यांच्यासोबत असलेल्या महिला हे झेन कारने (एमएच १५ बीडी ३९३४) टिळकवाडीत आले़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कारमधील महिला या ज्यूस पिण्यासाठी गेल्या़ तर त्र्यंबकरोडपासून त्यांच्या मागावर असलेल्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी महिलांनी तुम्हाला बोलावल्याचा निरोप दिला़
रहाडे या कारमधून उतरून दुकानाकडे गेल्या असता काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर असलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्याच्याजवळील बॅगने कारच्या डाव्या बाजूची काच फोडली़ यामुळे मोठा आवाजही झाला, मात्र आवाज नेमका कुठून आला याचा अंदाज नागरिकांना आला नाही़ ही संधी साधून या संशयितांनी कारमधील एक लाख रुपये व कागदपत्रे असलेली बॅग उचलून रामायण बंगल्यापासून शरणपूररोडच्या दिशेने पळ काढला़
रहाडे यांना दुचाकीवरील दोघांचा संशय आल्याने तसेच त्यांनी त्यांच्याकडील बॅग पाहताच आरडाओरड केली़ तर काही तरुणांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला मात्र ते फरार झाले़ या संशयितांचा पाठलाग करणार्‍यांनी चोरट्यांची काळी पल्सर दुचाकी असून तिचा नंबर एमएच १६, ६५५४ असल्याचे पोलिसांना सांगितले़ दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे हे घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी शहरात नाकाबंदी करण्याच्या सूचनाही दिल्या़; मात्र चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही़ (प्रतिनिधी)