शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात दोन दहशतवादी ठार, सोपोरमध्ये तणाव; घरामध्ये लपून बसले होते दोघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:14 IST

काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोर शहरात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रीनगर : काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोर शहरात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या भागात आणखी दहशतवादी लपले आहेत का, हे शोधण्यासाठी मोहीम सुरू आहे.सोपोर शहरातील शंकर गुंड ब्राथ भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलाच्या जवानांनी तिथे त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. त्यात दोन दहशतवादी ठार झाले, असे सांगण्यात आले.दोन्ही अतिरेकी दोघे हिजबुल मुजाहिद्दिन या संघटनेचे सदस्य आहेत. परवेझ अहमद वणी व नईम अहमद नजर परवेझ हा गेली सात वर्षे अतिरेकी कृत्यांत सहभागी होता, तर नईम गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय होता. ते ज्या घरात लपले होते, ते पीरजादा बशीर अहमद शाह याचे होते. ते गोळीबारानंतर आगीत भस्मसात झाले आहे. (वृत्तसंस्था)इंटरनेट बंददहशतवाद्यांना ठार केल्याचे वृत्त पसरताच सोपोर आणि आसपासच्या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी मोबाइल व इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केली आहे. तिथे कडक बंदोबस्त आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerrorismदहशतवाद