शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांशी चकमकीत दोन जवान शहीद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 04:48 IST

झारखंडची राजधानी रांचीजवळच्या हेसापीडी जंगलात शुक्रवारी पहाटे चार वाजता एसटीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली.

- एस. पी. सिन्हारांची : झारखंडची राजधानी रांचीजवळच्या हेसापीडी जंगलात शुक्रवारी पहाटे चार वाजता एसटीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. यात एसटीएफचे दोन जवान शहीद झाले, तर अन्य काही जवानांना गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. विशेष पोलीस अधीक्षक अनीश गुप्ता, डीआयजी ए.व्ही. होमकरसह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि सर्च आॅपरेशन सुरू आहे.असे सांगण्यात येत आहे की, एका जवानाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या जवानाचा रांचीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.मुख्यमंत्री रघुवर दास यांनी जवानांच्या धाडसाचे कौतुक करताना म्हटले आहे की, नक्षली आपल्या अस्तित्वाची अखेरची लढाई लढत आहेत. त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. दशम फॉल भागात नक्षली झोनल कमांडर महाराज प्रामाणिक असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सर्च आॅपरेशन सुरू करण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी सूचना देऊनही खूपच कमी संख्येने जवानांना पाठविण्यात आले.या घटनेनंतर पोलीस महासंचालक कमलनयन चौबे हे मुख्यमंत्री रघुवर दास यांना भेटले. शहीद जवानांचे पार्थिव झारखंडच्या जगुआर मुख्यालयाकडे रवाना करण्यात आले.एसटीएफच्या शहीद जवानांची नावे खंजन कुमार महतो आणि अखिलेश राम अशी आहेत. अखिलेश राम हे पलामू जिल्ह्याच्या लेस्लीगंजचे रहिवासी होते. खंजन कुमार महतो हे रांची जिल्ह्याच्या सोनाहातू पोलीस ठाण्यांतर्गतच्या चैनपूरचे रहिवासी होते. हे जवान झारखंडमध्ये तैनात होते. अखिलेश राम यांना तीन गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीIndian Armyभारतीय जवान