निमगाव केतकीत दोन दुकाने फोडले
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
इंदापूर : निमगाव केतकी येथे लाकडी दांडके व लोखंडी गजाने दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अज्ञात चोरट्यांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निमगाव केतकीत दोन दुकाने फोडले
इंदापूर : निमगाव केतकी येथे लाकडी दांडके व लोखंडी गजाने दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अज्ञात चोरट्यांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल चंद्रकांत महाजन (रा. निमगाव-केतकी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. केतकेश्वर विद्यालयाच्या पश्चिमेला महाजन यांचे बालाजी इलेक्ट्रिक मशिनरींचे दुकान आहे. काल (दि. १३ मार्च) रात्री आठ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना दुकान उचकटल्याची माहिती देणारा फोन आला. दुकानात जाऊन पाहिले असता, त्यांच्या दुकानातील चार हजार रुपये किमतीच्या अर्धा एच.पी. क्षमतेच्या दोन इलेक्ट्रिक मोटार, २ हजार २२५ रुपयांची कोठारी कंपनीची केबल व पाच हजार रुपयांची रोकड गायब झाल्याचे त्यांना दिसून आले. शेजारच्या जयकुमार भारत वजरीनकर यांच्या दुकानातील दोन हजार रुपयांची रोकडही याच पद्धतीने लंपास केल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नीलपत्रेवार पुढील तपास करीत आहेत.