शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

हिमाचल आपत्ती: विद्यार्थिनींनी मुख्यमंत्र्यांना दिली पिगी बँक; रिलीफ फंडसाठी 20 हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 15:09 IST

राज्यात आलेल्या आपत्तीनंतर हिमाचल सरकार मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीसाठी पैसे जमा करण्यात व्यस्त आहे. या निधीत आतापर्यंत 180 कोटी रुपये जमा झाले आहेत. 

लहान मुलं ही देवाचं रूप असल्याचं म्हटलं जातं. ते जे काही करतात ते अगदी प्रामाणिकपणे करतात. अशी एक हृदयस्पर्शी घटना हिमाचल प्रदेशातून समोर आली आहे. शिमल्यामध्ये दोन मुलींनी आपत्ती निवारण निधीसाठी आपला पॉकेटमनी दान केला आहे. राज्यात आलेल्या आपत्तीनंतर हिमाचल सरकार मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीसाठी पैसे जमा करण्यात व्यस्त आहे. या निधीत आतापर्यंत 180 कोटी रुपये जमा झाले आहेत. 

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी 51 लाख रुपयांची देणगी दिली आहे, तर त्यांची आई संसार देवी यांनीही मुख्यमंत्री आपत्ती मदत निधीमध्ये 50 हजार रुपयांची रक्कम जमा केली आहे. मात्र, या आपत्तीमुळे राज्यात 8667.95 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्याची भरपाई करणे खूप कठीण होईल. मात्र या संकटाच्या काळात दोन शाळकरी मुलींनी मदतीचा हात पुढे केला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवार, 24 सप्टेंबर रोजी दोन मुलींनी आपला सर्व पॉकेटमनी राज्याच्या आपत्ती निवारण निधीला दिला आहे. या निष्पाप मुलीने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासमोर आपली पिगी बँक नेली आणि पॉकेटमनी दान केला.

इयत्ता 7वीत शिकणाऱ्या आहाना वर्माने 10,229 रुपये आणि इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी जिया वर्माने 9,806 रुपये आपत्ती मदत निधीसाठी दान केले. मुलांच्या चांगुलपणाचे कौतुक करताना मुख्यमंत्री सक्खू म्हणाले की, मुलीही या चांगल्या कामासाठी देणगी देत ​​आहेत ही आनंदाची बाब आहे. यामुळे आपत्तीग्रस्तांना मदत करून त्यांच्या समस्या सोडविण्यास निश्चितच मदत होईल. या मुलांनी एकतेचा आदर्श घालून दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या दोन मुलींच्या अमूल्य योगदानाचे मला कौतुक वाटते. राज्यातील लहान मुलंही आपत्तीग्रस्तांचे दुःख कमी करण्यासाठी हातभार लावून मानवतेचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत आहेत. या चिमुकल्यांचा हा प्रयत्न संपूर्ण समाजासाठी अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश