शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गायी चोरल्याचा संशय, जमावाच्या जबर मारहाणीत दोन मुस्लिम तरूणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 17:41 IST

मुस्लिम तरूणांना गोरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या मारहाणीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. गायी चोरल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत दोन मुस्लिम तरूणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देगायी चोरल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत दोन मुस्लिम तरूणांचा मृत्यू झाला आहे.पश्चिम बंगालच्या जलीपैगुडी जिल्ह्यातील धुपगुरी गावाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास  ही घटना घडली.

जलीपैगुडी, दि. 27 - मुस्लिम तरूणांना गोरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या मारहाणीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. गायी चोरल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत दोन मुस्लिम तरूणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालच्या जलीपैगुडी जिल्ह्यातील धुपगुरी गावाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास  ही घटना घडली.गायी चोरल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या जबर मारहाणीत हफीझुल शेख आणि अन्वर हुसैन या दोघांचा मृत्यू झाला. जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीनंतर दोघांना रूग्णालयात नेण्यात आले होते, पण  मात्र उपचार सुरू करण्यात आधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे. दरम्यान दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. हफीझुल आणि अन्वर हे दोघे एका पिक अप व्हॅनमधून प्रवास करत होते.या व्हॅनमध्ये सात गायी होत्या, व्हॅनच्या ड्रायव्हरला रस्ता सापडला नाही म्हणून त्याने ही व्हॅन धुपगुरी गावाजवळ आणली तर गाडीतील गाडी पाहून  गावकऱ्यांनी गोंधळ घातला.गावकऱ्यांच्या गोंधळामुळे ड्रायव्हरने गाडी अजून वेगात पळवायचा प्रय़त्न केला पण गावक-यांनी रस्ता अडवून गाडी थांबवली. दरम्यान चालकाने उडू मारून घटनास्थळावरून पळ काढला. पण अन्वर आणि हफीझुल या दोघांना गावकऱ्यांनी पकडले आणि गाय चोरणारे चोर असल्याच्या संशयावरून जबर मारहाण केली.हे दोघेही चोर आहेत की नाही याची खात्री अद्याप पटलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांनी व्हॅनमध्ये असलेल्या गायी खरेदी केल्या असाव्यात आणि ते दोघेही व्यापारी असावेत अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.