शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

CoronaVirus: पंतप्रधान कार्यालयातून दोन अधिकारी हलवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 05:51 IST

ते करताना त्यांनी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना आणखी तीन महिन्यांसाठी त्याच पदावर कायम राखण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : आश्चर्यकारक अशा घडामोडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दोन अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) हलवले. मोदी यांचे गुजरातपासून अत्यंत विश्वासू समजले जाणारे व अतिरिक्त सचिवपद भूषवत असलेले ए. के . शर्मा यांना मध्यम आणि लघु व सुक्ष्म उद्योग (एमएसएमई) विभागात फारसे महत्व नसलेल्या सचिव पदावर हलवले. आणखी एक अतिरिक्त सचिव पदावरील तरूण बजाज यांच्याकडे आर्थिक कामकाज सचिवपद दिले आहे. रविवारी मोदी यांनी सचिव आणि अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ३५ बदल केले. ते करताना त्यांनी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना आणखी तीन महिन्यांसाठी त्याच पदावर कायम राखण्याचा निर्णय घेतला.सुदान या येत्या ३० एप्रिल रोजी वयोमानानुसार निवृत्त होणार होत्या. कोरोना विषाणूविरुद्धच्या (कोविड−१९) लढाईसाठी सुदान यांना त्या पदावर कायम राखले जाईल, अशी जोरदार चर्चाही होती. प्रीती सुदान यांचा अपवाद वगळता सेवानिवृत्त होणा-या इतर कोणत्याही सचिवाला मुदतवाढ दिली गेलेली नाही. भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) गुजरात केडरचे अतनू चक्रवर्ती यांना आर्थिक कामकाज मंत्रालयात मुदतवाढ मिळेल अशी जोरदार चर्चा होती. परंतु, तसे काही झाले नाही. दुसरी आश्चर्यकारक घडामोड म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालयात अमित खरे यांना सचिव म्हणून परत आणणे. खरे हे या आधी माहिती व प्रसारण मंत्रालयात होते व त्यांना सचिव (उच्च शिक्षण) म्हणून पाठवले गेले होते.माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना अमित खरे परत मंत्रालयात हवे होते, असे कळते. त्यामुळे खरे यांना अतिरिक्त जबाबदारी दिलीअसली तरी ती तीन महिन्यांची आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की तीन महिन्यांनंतर आणखी एकदा खांदेपालट होणार. गुजरात केडरच्या अनिता खारवाल या शालेय शिक्षण विभागाच्या नव्या सचिव असतील. सध्या त्या सीबीएसईच्या सचिव होत्या. अपूर्वा चंद्रा हे संरक्षण मंत्रालयात (संपादन) अतिरिक्त सचिव होते. त्यांना त्याच मंत्रालयात विशेष सचिवपदी बढती मिळाली असून त्यांच्याकडे पूर्वीचीच जबाबदारी आहे. अपूर्वा चंद्रा हे भारतीय प्रशासन सेवेतीलमहाराष्ट्र केडरच्या १९८८ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. हिमाचल प्रदेश केडरचे तरुण कपूर हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात नवे सचिव असतील. सध्याचे सचिव एम. एम. कु ट्टी हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत.<नितीन गडकरींच्या मंत्रालयात नवे सचिवरस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयातही नवे सचिव येतील. अरामाने गिरीधर हे संजीव रंजन यांची जागा घेतील. अरामाने हे मंत्रिमंडळ सचिवालयात अतिरिक्त सचिव होते. अशा प्रकारे नितीन गडकरी यांना दोन नवे सचिव मिळतील व दोन्ही मंत्रालये त्यांच्याचकडे आहेत.

टॅग्स :prime ministerपंतप्रधान