शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भुरट्या चोरांचा उच्छाद, वर्षभरात रेल्वेतून चोरीस गेले दोन लाख टॉवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 13:11 IST

रेल्वेतून होणारी किरकोळ वस्तूंची चोरी ही रेल्वे प्रशासनासाठी गंभीर समस्या बनली आहे.

मुंबई - रेल्वेतून होणारी किरकोळ वस्तूंची चोरी ही रेल्वे प्रशासनासाठी गंभीर समस्या बनली आहे. गेल्या आर्थिक वर्षात लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून सुमारे एक लाख 95 हजार टॉवेल चोरीस गेली आहेत. इतकेच नाहीतर 81 हजार 736 चादरी,  55 हजार 573 उशांची कव्हरे, 5 हजार 038 उशा आणि 7 हजार 043 पांघरुणांवरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून चोरीस जाणाऱ्या सामानामध्ये 200 टॉयलेट मग, एक हजार टेप आणि 300 हून अधिक फ्लश पाइपचाही समावेश आहे. सोमवारी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात रतलामला जाणाऱ्या एका व्यक्तीला 3 पांघरुणे, 6 चादरी आणि तीन उशा चोरल्याच्या आरोपाथाली अटक करण्यात आली होती.दरम्यान, यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या काळात रेल्वेमधून 79 हजार 350 टॉवेल, 27 हजार 545 चादरी, 21 हजार 50 उशांची कव्हरे 2 हजार 150 उशा आणि 2 हजार 65 पांघरुणे चोरीस गेली आहेत. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत तब्बल 62 लाख रुपये एवढी आहे.   गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये रेल्वेला सुमारे चार हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे रेल्वेत होणाऱ्या किरकोळ चोऱ्यांमुळे झाले आहे. रेल्वेतून चादरी आणि अन्य वस्तूंच्या चोरीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई कोच अटेंडेंटला करावी लागते, तर बाथरूममधील सामानाच्या नुकसानीची भरपाई रेल्वे करते. रेल्वेत वापरण्यात येणाऱ्या बेडशीटची किंमत 132 रुपये, टॉवेल 22 रुपये आणि उशीची किंमत 25 रुपये असते. मात्र प्रवाशांना नव्याने उपलब्ध करून दिलेल्या वस्तू पुन्हा रेल्वेकडे येत नाहीत.सेंसर टेप आणि सीसीटीव्हीसारख्या सुविधा उपलब्ध असूनही वस्तू चोरीस जातात. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेThiefचोरcentral railwayमध्य रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वे