शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लष्करातील महिलांच्या 100 जागांसाठी आले तब्बल दोन लाख अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 14:58 IST

लष्करामध्ये प्रथमच अधिकारी रँकच्या खालील महिलांची भरती होत असून, या भरती प्रक्रियेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

नवी दिल्ली - लष्करामध्ये प्रथमच अधिकारी रँकच्या खालील महिलांची भरती होत असून, या भरती प्रक्रियेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. लष्कराच्या पोलीस कोअरमधील जवानांच्या 100 पदांसाठी तब्बल दोन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज पाठवले आहेत. आतापर्यंत लष्करामध्ये केवळ अधिकारीपदांवरच महिलांची भरती होत असे. तसेच युद्धनौका आणि पाणबुड्यांवरील सेवेपासूनही महिलांना दूर ठेवले जाई. त्याबरोबरच लष्करातील पायदळ, चिलखती कोअर आणि तोपची सैनिक या पदांवर महिलांना सेवा देता येत नसे. मात्र आता महिलांसाठी लष्करातील अधिकारी रँकच्या खालील पदासाठी पहिल्यांदाच भरती होत आहे. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, ''महिलांना शिपाई म्हणून लष्कराच्या पोलीस कोअरमध्ये भरती करणे हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. 25 एप्रिलपासून लष्कराच्या पोलीस कोअरमध्ये 100 पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली होती. आता या भरतीसाठीचे शिबीर याच महिन्याच्या शेवटी बेळगाव येथे होणार आहे.''   त्याबरोबरच भारतीय लष्कर प्रादेशिक सेनेमध्ये एक महिला प्रोव्होस्ट युनिटची स्थापना करण्याची योजना आखत आहे. असे पहिल्यांदाच होणार असून, या युनिटमध्ये दोन अधिकारी, तीन ज्युनियर कमिशंड अधिकारी आणि एकूण 40 शिपाई असतील. दरम्यान यासाठी अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. मात्र त्यासाठी आवश्यक ती मंजुरी लवकरच मिळेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.  लष्करामध्ये अधिकारी रँकच्या खालील जवान पदांवर सुमारे 1700 महिलांची भरती करण्याचा लष्कराचा मानस आहे. ही भरती प्रक्रिया पुढील 17 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने केली जाईल.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानWomenमहिला