शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

याला म्हणतात नशीब! खाणीत सापडले मौल्यवान हिरे अन् क्षणातच मजूर झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 12:31 IST

Diamonds News : हिऱ्याच्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत.

कोणाचं नशीब हे कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात लखपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये घडली आहे. दोन मजुरांचं नशीब फळफळलं आहे. हिऱ्याच्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत. दिलीप मिस्त्री यांना कृष्णा कल्याणपूर भागातील जुरापूर खाणीतून 7.44 कॅरेटचा हिरा मिळाला आहे तर लखन यादव यांना 14.98 कॅरेटचा एक हिरा मिळाल्याची माहिती मिळत आहे. 

पन्ना जिल्ह्यातील हिरा निरीक्षक अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मजुरांनी कार्यालयात दोन हिरे जमा केले आहे. हिऱ्याची योग्य किंमत अधिकाऱ्यांकडून ठरविली जाईल. एका अंदाजानुसार 7.44 कॅरेटचा हिरा सुमारे 30 लाख रुपये असू शकतो तर 14.98 कॅरेटचा हिरा त्यापेक्षा दुप्पट असू शकतो. या दोन्ही हिऱ्यांचा लिलाव होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यानंतर 12.5 टक्के रॉयल्टी वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम या दोन कामगारांना देण्यात येईल.

"देवाच्या कृपेने मला पहिल्यांदा हा दर्जेदार आणि मौल्यवान हिरा मिळाला"

"आम्ही आनंदी आहोत. मी एक छोटा शेतकरी आहे आणि माझ्याकडे दोन एकर जमीन आहे. पहिल्यांदाच मला हिरा मिळाला. मिळालेल्या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे" अशी माहिती लखन यादव यांनी दिली. तर आम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून मेहनत करत आहोत. देवाच्या कृपेने मला पहिल्यांदा हा दर्जेदार आणि मौल्यवान हिरा मिळाला आहे" असं दिलीप मिस्त्री यांनी म्हटलं आहे. 

पन्ना जिल्हा हिऱ्यांसाठी प्रसिद्ध

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी केला गेलेला लॉकडाऊनमुळे लाखो मजुरांचे हाल झाले. हाताला काम नसल्यानं अनेक मजुरांनी गावची वाट धरली. मात्र मध्य प्रदेशातल्या पन्ना जिल्ह्यातल्या रानीपूरमधील खाणीत काम करणाऱ्या नऊ मजुरांचं  याआधी काही महिन्यांपूर्वी नशीब चमकलं होतं. त्यांना 10 कॅरेट 69 सेंटचा हिरा सापडला आहे. या हिऱ्याची किंमत 50 लाख इतकी होती. काही दिवसांपूर्वी याच खाणीत एका मजुराला 70 सेंटचा हिरा सापडला होता. हे दोन्ही हिरे कार्यालयात जमा करण्यात आले असून लवकरच त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. पन्ना जिल्हा हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आधीही अनेक शेतकरी आणि मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश