ऑनलाइन टीम
सहारनपूर, दि. २६ - जमिनीच्या मालकीवरून असलेल्या वादाचे पर्यवसान दोन समाजातील दंगलीमध्ये झाले असून यामध्ये दोन जणांनी प्राण गमावले आहेत तर १२ जण जखमी झाले आहेत. सहारनपूरमधील कुतूबशेर भागामध्ये ही वादग्रस्त जागा आहे. आज पहाटे एका समाजाच्या लोकांनी येथे बांधकामास सुरुवात केली. त्यास दुस-या समाजातल्या लोकांनी आक्षेप घेतला. याचे पर्यवसान भांडण व नंतर हाणामारीत झाले व या भागात दंगल उसळली. दगडविटांचा मारा एकमेकांवर करत या भागातील अनेक दुकानेही जाळण्यात आली. संपूर्ण परीसरात कर्फ्यू बजावण्यात आला असून लोकांनी शांतता पाळावी असे आवाहन पोलीस करत आहेत.
दंगलग्रस्तांवर कठोरपणे कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिले आहेत.