शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद, तीन नागरिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 06:26 IST

जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. येथील अखनूर परिसरात पाकिस्तानच्या रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. येथील अखनूर परिसरात पाकिस्तानच्या रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रात्रभर सुरू असलेल्या या गोळीबारात नियंत्रण रेषेजवळ असलेल्या गावांमध्येही मोठे नुकसान झाले असून, या गोळीबारात तीन नागरिक जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, येथील अखनूर आंतरराष्ट्रीय सीमाभागात पाकिस्तानच्या रेंजर्सकडून शनिवारी रात्री उशिरा भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. तसेच नियंत्रण रेषेवरील गावातील तीन नागरिकही या गोळीबारात जखमी झाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टर परिसरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. 

 

 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलJammu Kashmirजम्मू-काश्मीर