शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्यात बुडालेल्या दोघांचे मृतदेह तीन मित्र बाईकवरून आणत होते घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:00 IST

दोघांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळेलला असताना त्यांच्या मित्रांनी मात्र सगळ्यांना धक्का बसेल अशी कृती केली.

चेन्नई- आंध्र प्रदेशातील टाडा धबधब्यात दोन जण बुडल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. या दोन जणांमध्ये एका कॉलेजच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे. या दोघांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळेलला असताना त्यांच्या मित्रांनी मात्र सगळ्यांना धक्का बसेल अशी कृती केली. मृत्यू झालेल्या दोघांच्या तीन मित्रांनी त्यां दोघांचे मृतदेह बाईकवरून घरी आणले.

बाईक चालविणारा व मागे बसलेल्याच्या मध्ये असलेल्या जागेत एक मृतदेह व दुसऱ्या बाईकच्या मागे एक मृतदेह अशी व्यवस्था करून त्यांनी मृतदेह घरी आणायचं ठरवलं. एका बाईकवर बाईक चालविणारा व मागे बसलेल्या मित्राच्यामध्ये मृतदेह व्यक्ती बाईकवर बसतो त्याच प्रमाणे बसवला. रस्त्यावरून येत असताना तिरूपती-चेन्नई रोडवर पोलिसांना झेंडा दाखविल्याने गाडी थांबविताना मृतदेह खाली पडला. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. 

पाच मित्र मोटारसायकल ट्रिपवर गेले होते. त्यावेळी पाच मित्रांपैकी दोन जण धबधब्यात पडले. या दोघांना बाहेर काढून इतर तिघांनी यंत्रणेला या संदर्भातील माहिती देण्याऐवजी बाईकवरून मृतदेह घरी नेण्याचं ठरविलं. मृतदेह बाईकवरून घरी आणत असताना पोलिसांना या दोन तरूणांना रस्त्यावर झेंडा दाखवून थांबायला सांगितलं त्यावेळी यशवंथ व यसिन या दोघांचे मृतदेह खाली झुकले. यशवंथ भगवान सिंग (वय 19), यसिन (वय 30) अशी तरूणांची नाव आहेत. आम्ही पाच जण धबधब्यामध्ये खेळत असताना यशवंथने धबधब्यातील पोहण्याच्या ठिकाणी उडी मारली. तेथे चिखल असल्याने तो त्याल अडकला. यसिन यशवंथला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तो ही त्यात अडकला व त्याचा मृत्यू झाल्याचं, या तीन मित्रांनी पोलिसांना सांगितलं. 

दोन मित्र चिखलात अडकल्यावर इतर तिघांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मुलांच्या आवाजानंतर स्थानिकांनी तेथे येऊन मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. मुलांनी बाईकवरून मृतदेह घरी आणण्याचा निर्णय नेमका का घेतला? याबद्दलची माहिती पोलीस घेत आहेत. मोटारबाईक ट्रिपवर निघालेल्या पाच जणांनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रोडट्रिप सुरू केली होती. त्यानंतर दुपारी ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविले असून मृतांच्या कुटुंबीयांना याबद्दल कळविण्यात आलं आहे.