शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

GST Impact- एकाच पदार्थावर दोन वेगवेगळे जीएसटीचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 12:02 IST

तुमच्या आवडीच्या मिठाईच्या दुकानात रसमलाई खायला गेल्यावर काउंटरवर उभं राहून मिठाई खाण्यात आणि दुकानात टेबलवर बसून मिठाई खाण्यात काय फरक आहे ? असा प्रश्न विचारल्यावर जास्त फरक नाही हेच उत्तर मिळतं

ठळक मुद्देGST Impact- एकाच पदार्थावर दोन वेगवेगळे जीएसटीचे दरतुमच्या आवडीच्या मिठाईच्या दुकानात रसमलाई खायला गेल्यावर काउंटरवर उभं राहून मिठाई खाण्यात आणि दुकानात टेबलवर बसून मिठाई खाण्यात काय फरक आहे ? असा प्रश्न विचारल्यावर जास्त फरक नाही हेच उत्तर मिळतंदुकानात बसून मिठाई खाण्याच्या कम्फर्ट व्यतिरीक्त दोन वेगवेगळे जीएसटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

नवी दिल्ली, दि. 27- तुमच्या आवडीच्या मिठाईच्या दुकानात रसमलाई खायला गेल्यावर काउंटरवर उभं राहून मिठाई खाण्यात आणि दुकानात टेबलवर बसून मिठाई खाण्यात काय फरक आहे ? असा प्रश्न विचारल्यावर जास्त फरक नाही हेच उत्तर मिळतं. दुकानात बसून आरामात रसमलाई खाऊ शकतो. असं उत्तर दिलं जाइल. पण दुकानात बसून मिठाई खाण्याच्या कम्फर्ट व्यतिरीक्त दोन वेगवेगळे जीएसटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही दुकानाच्या काउंटरवर थांबून मिठाई खाल्ली आणि बील भरून लगेच दुकानाच्या बाहेर पडलात तर विक्रेत्याकडून बीलावर 5 टक्के जीएसटी आकारला जाइल पण जर तुम्ही दुकानात एसीमध्ये बसून मिठाई किंवा इतर पदार्थ खाल्ला तर तुम्हाला 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल. हाच नियम आवडीच्या असलेल्या ढोकळा या पदार्थावरही लागू होइल. जर दुकानाच्या काउंटरवरून ढोकळा घेऊन गेलात तर 12 टक्के जीएसटी द्यावा लागेल पण जर तिथेच बसून ढोकळा खाल्ला तर 18 टक्के जीएसटी लागू होइल. प्रत्येक दुकानादार यासाठी आपली वेगळी पद्धत सुरू करत आहेत.  दिल्लीतील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात ग्राहकांना बसून खाण्याची  सुविधा नाहीये पण तिथे काही टेबल लावण्यात आले आहेत. तिथे थांबून लोक मिठाई खाण्याचा आनंद घेतात. त्या दुकानात ग्राहकांकडून 5 टक्के जीएसटी घेतला जातो. 'जर तुमच्या दुकानात बसण्यासाठी मोठी जागा असेल तर जास्त टॅक्स घेऊ शकता. पण आमच्या दुकानात इतकी मोठी जागा नाही, असं त्या दुकानाच्या मालकाने सांगितलं आहे. विशेष म्हणजे दुकानात असलेल्या वेगवेगळ्या करपद्धतीबद्दल बऱ्याच ग्राहकांना माहिती नाही. म्हणूनच हातात बील आल्यावर टॅक्स पाहून त्यांना आश्चर्य वाटतं.  टॅक्स एक्सपर्टच्या मते, जीएसटीच्या बाबतीतील सद्यस्थितीबद्दल ग्राहकांना माहिती असणं गरजेचं आहे. एकाच पदार्थासाठी टॅक्समधील फरक ग्राहकांना माहिती असायला हवी. जो पदार्थ दुकानाच्या काउंटवर थांबून खाल्ल्यावर कमी टॅक्स लागतो तोच पदार्थ जर दुकानात टेबलावर बसून आरामात ऑर्डर केला तर जास्त टॅक्स द्यावा लागेल. मिठाई व्यतिरिक्त इतर फास्ट फूडच्या दुकानांमध्येही अशा प्रकारचा टॅक्स लागला जाऊ शकतो. जर हॉटेलमध्ये बसून चहा प्यायलात तर 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल पण तोच चहा जर बाहेर थांबून प्यायला तर 12 टक्के जीएसटी लागू होतो. वातानुकुल हॉटेलमध्ये बीलावर 18 टक्के जीएसटी निश्चित आहे तर इतर हॉटेलच्या बीलावर 12 टक्के जीएसटी निश्चित आहे.