शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनी शब्द पाळून फोडले आमदार; २ दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीसांची खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 06:24 IST

महाराष्ट्रात भाजप नेतृत्व प्रदीर्घ काळापासून मविआ फोडण्याच्या फॉर्म्युल्यावर काम करीत आहे.

- संजय शर्मा 

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही दिल्लीत आले होते. तेव्हा भाजप श्रेष्ठींशी त्यांची याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांना ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन येतो, असे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ५३ असून, आमदारांचे सदस्यत्व वाचविण्यासाठी दोनतृतीयांश म्हणजेच ३६ आमदार आवश्यक असणार आहेत.

महाराष्ट्रात भाजप नेतृत्व प्रदीर्घ काळापासून मविआ फोडण्याच्या फॉर्म्युल्यावर काम करीत आहे. आधी शिवसेनेचे दोन तुकडे केले. आता त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचेही तेच केले जात आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत भाजप व स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतेत होते. त्यामुळे भाजपने अनेक मायक्रो ऑपरेशन घडवून आणले आहेत. के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रात सक्रिय होणे, हा त्याच रणनीतीचा भाग आहे. यामुळे मविआची मते विभागली जाणार आहेत.

केंद्रातही मंत्रिपदाची आशामोदींच्या मंत्रिमंडळात या महिन्यात फेरबदल होणार असून, शिवसेना शिंदे गटाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. यावेळी सर्व काही ठरले आहे. एक कॅबिनेट मंत्रिपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार हे नाव निश्चित करतील.

‘जे काही झाले, ते अपेक्षितच’ महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आता शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये उत्साह दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आता तीन इंजिनचे सरकार आले आहे. मविआला दोन वर्षांत दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, जे काही झाले, ते तर होणे अपेक्षितच होते. फरक फक्त एवढा आहे की, ते आता झाले आहे. अजित पवार भाजपबरोबर येण्यासाठी प्रदीर्घ काळापासून तयार होते. याबाबत भाजप नेतृत्वाच्या त्यांच्याबरोबर चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या होत्या. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस