शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

दोन दलित अल्पवयीनांची जमावाने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 2:42 AM

उघड्यावर शौचास बसल्याने हत्या

शिवपुरी : मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यामध्ये भावखेडी गावात उघड्यावर शौचाला बसल्याची शिक्षा म्हणून दोन दलित अल्पवयीनांची बुधवारी सकाळी हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्याच गावातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.हत्या करण्यात आलेल्यांमध्ये एक मुलगा व एक मुलगी, असून त्यांचे वय अनुक्रमे १० व १२ वर्षे आहे. हे भीषण कृत्य करणाऱ्या हकीम यादव व रामेश्वर यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील एका आरोपीने सांगितले की, या दोन अल्पवयीनांची हत्या करण्यापूर्वी मोबाईलमधून त्यांची छायाचित्रे काढली होती. देवाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही सैतानांना ठार मारले, असे निर्लज्ज समर्थन या प्रकरणातील आरोपीने पोलिसांकडे केले आहे.सिरसोड पोलीस ठाण्याचे प्रमुख आर.एस. धाकड यांनी सांगितले की, भावखेडी गावातील पंचायत भवनासमोर ही दोन मुले उघड्यावर शौचाला बसली होती. त्याबद्दल या मुलांना हकीम व रामेश्वर यादव यांनी दम दिला. त्यानंतर या अल्पवयीनांना काठ्यांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली.मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या मुलांना रुग्णालयात नेण्यात आले; पण तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मध्यप्रदेशात गोहत्येच्या संशयावरून जबर मारहाणीद्वारे अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींची हत्या केल्याचे प्रकार घडत आहेत. आता दलित समाजातील अल्पवयीनांची हत्या करण्यापर्यंत या राज्यातील समाजकंटकांची मजल गेली आहे. (वृत्तसंस्था)जादूटोण्याचाही संशयशिवपुरीचे पोलीस अधीक्षक राजेश चंडेल यांनी सांगितले की, या प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम ३०२ व अनुसूचित जाती-जमाती अत्याचारविरोधी कायद्यान्वये दोन्ही आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.दोन अल्पवयीनांच्या हत्या जादूटोण्याच्या प्रकारातून की, अस्पृश्यतेच्या भावनेतून करण्यात आल्या यासंदर्भात पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Lynchingलीचिंग