शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात काँग्रेसचे २ आमदार भाजपच्या गळास लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 04:15 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर कर्नाटक आणि मध्य प्रदेशात राजकीय उलथापालथ सुरुच आहे.

बेंगळूरु : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर कर्नाटक आणि मध्य प्रदेशात राजकीय उलथापालथ सुरुच आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या एस. एम. कृष्णा यांची काँग्रेसच्या दोन आमदारांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट औपचारिक असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र लोकसभा निवडणुकीतही कॉँग्रेसचे आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला होता.कॉँग्रेसचे रमेश जरकिहोली आणि डॉक्टर सुधाकर हे आमदार कृष्णा यांना भेटले. भाजपचे नेते आर. अशोक सुध्दा उपस्थित होते. जरकिहोली यांनी या मुलाखतीबद्दल खुलासा करताना सांगितले की, ही राजकीय भेट नव्हती. आम्ही केवळ कृष्णा यांना भेटण्यासाठी आलो होतो. भाजपने कर्नाटकात २५ जागांवर विजय मिळविल्याने त्यांचे अभिनंदन केले. ही केवळ औपचारिक भेट होती.आर.अशोक यांनीही या भेटीला कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, मी एस. एम. कृष्णा यांच्याशी आमच्या पक्षाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी आलो होतो. रमेश जरकिहोली आणि डॉक्टर सुधाकर यांच्याशी माझी मैत्री नाही. कर्नाटक मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, मात्र सरकार जेडीएस आणि कॉँग्रेसने एकत्र बनविले आहे. हे सरकार उलथवून लावण्यासाठी आॅपरेशन लोटस सुरू करण्यात आलेचे बोलले जात होते.>राजकीय नाट्य येणार आणखी रंगातकर्नाटक मध्ये राज्य सरकारची स्थापना करण्याची भाजपची संधी हुकली. पण, लोकसभेच्या २८ पैकी २५ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे भाजप संपूर्ण जोषात आहे. दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे सुध्दा निवडणूक हारले. माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा यांचाही दारुण पराभव झाला. तेव्हापासू कर्नाटक मध्ये सरकार स्थापनेनंतर राजकीय नाट्य सुरुच आहे. ते येत्या काळात रंगात येऊ शकते.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८