शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे दोन आमदार बेपत्ता? शोधाशोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:34 IST

कर्नाटकात सत्तेचे गणित जुळवण्याचा खेळ रंगलेला असतानाच काँग्रेसचे दोन आमदार हॉटेलमधून बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे.

बंगळुरू : कर्नाटकात सत्तेचे गणित जुळवण्याचा खेळ रंगलेला असतानाच काँग्रेसचे दोन आमदार हॉटेलमधून बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. दोन्ही आमदार रात्रीपासून हॉटेलवर परतले नसल्याचे आणि काँग्रेस नेते त्यांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.भाजपाला आपल्या आमदारांची फोडाफोडी करता येऊ नये यासाठी काँग्रेसने बंगळुरू-म्हैसुरू महामार्गावरील येथील इग्लटन रिसॉर्टमधील १२0 शाही खोल्या बुक केल्या आहेत. त्या पक्षाचे तसेच जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे आमदारही तिथेच मुक्काम ठोकून आहेत. मात्र बेल्लारीचे काँग्रेसचे आमदार आनंद सिंह आणि मस्की (जिल्हा : रायचूर)चे आमदार प्रताप गौडा-पाटील बुधवारी रात्री तिथे पोहोचले नाहीत. त्या दोघांचे मोबाइलही बंद असल्याने त्यांची शोधाशोध सुरू आहे.सकाळी येडियुरप्पा व भाजपाला पाठिंबा देणारे कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टीचे एकमेव आमदार आर. शंकर मात्र संध्याकाळी तेथून पळाले आणि पुन्हा काँग्रेस-जनता दलाच्या कॅम्पमध्ये दाखल झाले. आपला येडियुरप्पा यांना अजिबात पाठिंबा नाही, असेही त्यांनी बोलून दाखवले.

टॅग्स :congressकाँग्रेसKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८