शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सात तास कारमध्ये अडकल्याने दोन चिमुरड्यांचा गुदमरून मृत्यू; दिल्लीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 14:22 IST

कारमध्ये गुदमरून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देकारमध्ये गुदमरून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी हा कॅब चालक कॅब घराबाहेर पार्क करून घरात गेला होता. घरात गेल्यावर कार लॉक केली नसल्याचं त्याच्या लक्षात आल्यानं त्याने घरातूनच रिमोटने कार लॉक केली.

नवी दिल्ली- कारमध्ये गुदमरून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कॅब चालकाच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचं बोललं जातं आहे.  दिल्लीमध्ये ही घडली आहे. बुधवारी दुपारी हा कॅब चालक कॅब घराबाहेर पार्क करून घरात गेला होता. घरात गेल्यावर कार लॉक केली नसल्याचं त्याच्या लक्षात आल्यानं त्याने घरातूनच रिमोटने कार लॉक केली. पण तोपर्यंत त्याचा मुलगा आणि भाचा कारमध्ये खेळायला गेले होते. मुलगा आणि भाचा कारमध्ये खेळायला गेल्याचं कॅब चालकाला माहिती नव्हतं. पण इकडे तब्बल सात तास कारमध्येच राहिल्याने या दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

आऊटर दिल्लीच्या रणहोला परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. राजू असं या कॅब चालकाचं नाव आहे. तो बुधवारी दुपारी कॅब घेऊन घरी आला होता. घराबाहेर कार उभी करून तो घरात गेला. घरात वरच्या मजल्यावर गेल्यावर कार लॉक करायला विसरून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने वरूनच रिमोटने कार बंद केली. याच दरम्यान त्याचा मुलगा सोनू (वय ४) आणि त्याचा भाचा राज ( वय ६) हे दोघेही खेळताखेळता कारमध्ये गेले होते. कारमध्ये एसी सुरूच होता. त्यामुळे या मुलांना कारमध्ये झोप लागली. कार लॉक केल्यावर एसी बंद झाला. त्यानंतर सात तास कार न उघडल्याने त्यांचा कारमध्येच गुदमरून मृत्यू झाला. दुसरीकडे मुलं दिसत नाहीत म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.

मुलांना शोधण्यासाठी पालकांनी पोलिसांचीही मदत घेतली. अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनीही मुलांचा शोध घ्यायला सुरूवात केली. आजूबाजूच्या परिसरात मुलांचा शोध घेण्यात आला. पण तरीही मुलं सापडली नाही. शेवटी सात तासानंतर कारने बाहेर जाऊन मुलांना शोधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कारचा दरवाजा उघडताच दोन्ही मुलं कारच्या सीटवरून खाली पडलेली दिसली. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं होतं पण त्या मुलांचा मृत्यू झाला होता.

शवविच्छेदनानंतर या दोन्ही मुलांचे मृतदेह त्यांच्या मात्यापित्यांकडे सोपविण्यात आले आहेत. राजू हा बिहारचा रहिवासी आहे. या घटनेनंतर राजू आणि त्याचे कुटुंबीय बिहारला गेले आहेत. पोलिसांनी ही कॅब सीएफएसएलकडे तपासासाठी पाठविली आहे.

टॅग्स :carकारNew Delhiनवी दिल्ली