शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागा बंडखोरांच्या घातपाती हल्ल्यात दोन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 12:10 IST

नागालॅंडमधील मोन जिल्ह्यात नागा बंडखोरांच्या घातपाती हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर आणखी चार जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

कोहिमा : नागा बंडखोरांनी रविवारी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या चार जवानांना वीरमरण आले असून, ६ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड (खापलांग) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला.नागालँडमध्ये बराच काळ या संघटनेचे लोक व सरकार यांच्यात वाद सुरू आहेत. सरकारने नागा बंडखोरांशी चर्चा बंद केली असून, नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड (खापलांग) संघटनेवर सरकारने बंदी घातली आहेत. या संघटनेचे काही बंडखोर अनेकदा म्यानमारमध्ये लपून बसतात आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करीत असतात.या नागा दहशतवाद्यांनी काल सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर हल्ला केला. आसाम रायफल्सचे जवान पाणी आणण्यासाठी नदीजवळ गेले होते. ते नदीपाशी पोहाचेताच दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि आणि ग्रेनड हल्लाही केला. तिथे जवळपास तासभर गोळीबार व बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत होते अशी माहिती स्थानिकांनी दिली. जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ३० किमी दूर असलेल्या मोन जिल्ह्यातील अंबोई नगर येथील वस्तीजवळ ही घटना घडली. येथील स्थानिक लोकांनी सांगितले की, बंडखोर आणि जवान यांच्यात चकमक सुरु असताना गोळीबार आणि बॉम्बचा जवळपास एक तास मोठा आवाज येत होता.जखमींना आणले जोरहाटलाया हल्ल्याचे वृत्त कळताच, तेथून हेलिकॉप्टरच्या मदतीने जखमी जवानांना जोरहाट येथे आणले. तेथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागालँडमध्ये पहिली बंडखोरी... देशातील सर्वात पहिली बंडखोरी १९५० मध्ये नागालँडमध्ये सुरू झाली. त्यानंतर पुढच्या ३० वर्षांत भारतीय सैन्याने बंडखोरांविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे या बंडखोरांना भारत सरकारशी वाटाघाटी करण्यास भाग पाडले. नागालँडमधील बंडखोरीला 'मदर ऑफ ऑल बंडखोरी' असे म्हटले जाते. स्वतंत्र ग्रेटर नागालँडची मागणी करण्यात येत होती. या ग्रेटर नागालँडमध्ये नागालँडसह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूरही आहे. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड (एनएससीएन) या नावाने बंडखोरांनी संघर्ष सुरू केला. पुढे या एनएससीएनचे अनेक गट तयार झाले.