शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येसंदर्भात चॅट करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 11:34 IST

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोन जणांच्या उत्तराखंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

देहराडून (पिथौरागड) - संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोन जणांच्या उत्तराखंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. निर्मला सीतारामन पिथौरागड जिल्ह्यात एका वैद्यकीय शिबिराच्या उद्घाटनासाठी येण्यापूर्वी या दोघांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक रामचंद्र राजगुरु यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅपवर संरक्षणमंत्र्यांच्या हत्येसंदर्भातील माहिती समोर आली. सीतारामन यांच्या हत्येसंदर्भात चॅट करणाऱ्या दोघांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली'. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? दोघंही हत्यारं बाळगत होते का?, याबाबतची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.   शिवाय, ज्या ग्रुपवर सीतारामन यांच्या हत्येसंदर्भातील चॅट सुरू होते, त्या ग्रुप अॅडमिनची देखील चौकशी करण्यात आली आहे. या ग्रुपमध्ये चॅट करणाऱ्या व्यक्तीनं असे म्हटले होते की, 'निर्मला सीतारामनचा उद्याचा शेवट दिवस असेल. मी सीतारामनवर गोळ्या झाडेन. 'पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या प्रकरणी सध्या चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र दोघांनीही दारूच्या नशेत असताना चॅटिंग केल्याचे प्राथमिकदृष्ट्या निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.  

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनCrime Newsगुन्हेगारीNarendra Modiनरेंद्र मोदी