शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाख पणत्यांनी उजळली अयोध्या; दीपोत्सव उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 02:33 IST

मठ, मंदिरे, घरे आणि दुकानांवर रोषणाई

अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाने जागेच्या मालकीविषयीचा निकाल देण्याआधीच दिवाळीनिमित्त शनिवारी अयोध्या ५ लाख ५१ हजार दिव्यांच्या रोषणाईने झगमगून उठले. तेथील शरयू नदीच्या किनाऱ्यापासून प्रत्येक मंदिर, मठ, तसेच घरे, कार्यालये व दुकानांवर पणत्या व दिवे लावण्यात आले. त्यामुळे दीपोत्सवासाठी अयोध्या व शेजारील फैजाबाद शहर दिव्यांनी रंगून गेले.

तेथे ५ लाख ५१ हजार पणत्या व दिवे लावण्यात येणार असल्याचे कळताच गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे पथकही तेथे पोहोचले आहे. शरयू नदीचा किनारा खरे तर शुक्रवारी रात्रीच पणत्यांनी लखलखला होता. मंदिरे व मठांवर कालपासूनच पणत्या लावायला सुरुवात झाली होती. मठ व मंदिरांत व बाहेर दीड लाख पणत्या लावण्याची जबाबदारी साकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वत:कडे घेतली आहे.दीपोत्सवासाठी अयोध्या व फैजाबाद परिसरात तसेच शरयू नदीच्या तीरावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच धडक कृती दल, प्रांतिक सशस्त्र दलाचे जवान तिथे होते. त्याशिवाय गुप्तचर विभागही अतिशय सतर्क आहे. दीपोत्सवासाठी अयोध्येत येणाऱ्यांच्या मार्गांत अडथळा येऊ नये, यासाठी जड वाहनांना तेथे बंदी घालण्यात आली होती. लोकांना खरेदी करता यावी, यासाठी रात्री उशिरापर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. दीपोत्सवानिमित्त तेथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुद्दाम संध्याकाळी तेथे आले.रामकथा पार्कमध्ये राम, लक्ष्मण व सीतेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत करण्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळीच झाली. राम, सीता व लक्ष्मण यांची अयोध्येतून शोभायात्रा काढण्यात आली. रात्री शरयूच्या तीरावर आतषबाजीही करण्यात आली.

टॅग्स :DiwaliदिवाळीAyodhyaअयोध्या