शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याभरानंतर राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट अनलॉक; इतर काँग्रेस नेत्यांची अकाऊंट्सही सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 12:08 IST

ट्विटरकडून राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांची अकाऊंट्स पुन्हा सुरू

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनाट्विटरनं दिलासा दिला आहे. राहुल यांचं ट्विटर अकाऊंट आठवड्याभरानंतर अनलॉक करण्यात आलं आहे. शनिवारी ट्विटरनं राहुल यांचं अकाऊंट अनलॉक केलं. काँग्रेसमधील सुत्रांनी ही माहिती दिली. राहुल यांच्यासोबत पक्षाच्या इतर नेत्यांची ट्विटर अकाऊंट्सदेखील अनलॉक करण्यात आली आहेत.

ट्विटरनं का केलं अकाऊंट लॉक?राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्यावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ट्विट हटवलं होतं. पण आता त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलं होतं.

एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्यानं फोटोवर आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पीडितेच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार वकील विनीत जिंदल यांनी केली होती.  

राहुल यांची ट्विटरवर टीकाट्विटर ही सोशल नेटवर्किंग साइट पक्षपाती आहे. माझं ट्विटर अकाउंट तात्पुरतं बंद करण्यात आलं. ट्विटर अशी कृती करून भारताच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करीत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. आमचं राजकारण कसं असावं हे ट्विटर कंपनी ठरवू पाहात आहे. त्या कंपनीचं हे धोरण एक राजकीय नेता म्हणून मला मान्य नाही. ट्विटरची ही कृती म्हणजे देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर घाला आहे. मला ट्विटरवर २ कोटी फॉलोअर आहेत. माझे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद करून ती कंपनी या कोट्यवधी लोकांचा मतप्रदर्शनाचा हक्क नाकारत आहे. ट्विटर हे एक तटस्थ व्यासपीठ आहे, असं सांगितलं जाते. त्याला या गोष्टींनी तडा गेला आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटर