शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरचा पाय खोलात! बचावाची 'ती' ढाल गेली; आता सरकारकडून थेट कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 10:35 IST

कोणत्याही वापरकर्त्यानं भडकावू, चिथावणीखोर, बेकायदेशीर ट्विच केल्यास यापुढे ट्विटरच जबाबदार

नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९ च्या अंतर्गत मिळालेला सुरक्षेचा अधिकार ट्विटरनं गमावला आहे. त्यामुळे आता ट्विटरच्या अडचणी वाढल्या आहेत. यापुढे ट्विटरवर एखाद्या वापरकर्त्यानं बेकायदेशीर, चिथावणीखोर ट्विट केल्यास त्याची जबाबदारी ट्विटरची असेल. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून केली जाईल. ट्विटरनं वैधानिक अधिकाऱ्याच्या नियुक्तीस उशीर केला आहे. त्यामुळे ट्विटरच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.केंद्र सरकारने ट्विटरला दिला निर्वाणीचा इशारा, नव्या नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाईची बजावली नोटीस

नव्या आयटी नियमांनुसार ट्विटरला वैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी २५ मेपर्यंची मुदत देण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन आणि इतर कारणं देत ट्विटरनं अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या नाहीत. ट्विटरनं सुरुवातीला काही नियुक्त्या केल्या होत्या. मात्र त्या सरकारकडून फेटाळून लावण्यात आल्या. ट्विटरनं नेमलेले अधिकारी बाहेरील कायदेशीर सल्लागार होते. ते कंपनीशी थेटपणे जोडले गेलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या गेल्या.केंद्राने कारवाईचा इशारा देताच ट्विटरचा यु-टर्न; मोहन भागवतांसह अन्य नेत्यांचे ब्ल्यू टीक परतले

आम्ही एक अंतरिम मुख्य अधिकारी नियुक्त केला आहे. त्याबद्दलचा तपशील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला द्यायचा आहे, असं ट्विटरच्या प्रवक्त्यानं सांगितलं. 'आम्ही लवकरच याबद्दलचा तपशील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला देऊ. आमच्याकडून प्रत्येक टप्प्यावर घेण्यात येत असलेल्या निर्णयांची माहिती मंत्रालयाला दिली जाईल. नव्या नियमांचं पालन करण्यासाठी आम्ही शक्य तितके सर्व प्रयत्न करत आहोत,' अशी माहिती प्रवक्त्यानं दिली.

ट्विटरकडून आपल्याला अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील सुत्रांनी सांगितलं. 'वारंवार सूचना देऊनही कंपनीनं कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही. नव्या नियमांचं पालन करा अशी सूचना देणारी एक नोटीस ५ जूनला ट्विटरला पाठवण्यात आली. ही शेवटची नोटीस होती. नियमांचं पालन करा, अन्यथा मध्यस्थ व्यासपीठ म्हणून मिळणारी सवलत रद्द होईल याची जाणीव करून देण्यात आली होती. मात्र तरीही ट्विटरनं कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत,' अशी माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :Twitterट्विटर