शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील पूरग्रस्तांच्या साह्यासाठी एनडीआरएफची वीस पथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 04:34 IST

गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये सोळा जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे.

पाटणा - गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये सोळा जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे त्या राज्यात केंद्र सरकारने मदतकार्यासाठी एनडीआरएफची वीस पथके पाठविली आहेत. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनाही बचावकार्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. पुनर्वसन व मदत यात सरकारकडून होणाऱ्या विलंबामुळे लोक संतप्त झाले आहेत. पाटण्याच्या सरकारी रुग्णालयातही तीन फुटांहून अधिक पाणी आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे (एनसीएमसी) अध्यक्ष व कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी बिहारमधीलपूरस्थितीचा दिल्लीत मंगळवारी झालेल्या एका बैठकीत आढावा घेतला. एनडीआरएफच्या वीस पथकांमध्ये ९०० जवानांचा समावेश आहे. त्यातील सहा पथके पाटणा येथे पाठविण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन पाटण्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.पाटणा येथे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चार ज्यादा क्षमतेचे पंप केंद्रीय कोळसा खात्याने पाठविले आहेत. यापैकी प्रत्येक पंप दर मिनिटाला तीन हजार गॅलन पाण्याचा उपसा करू शकतो. पूरग्रस्त भागांमध्ये खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नीट व्हावा म्हणून बिहार सरकारने योग्य पावले उचलली आहेत. बिहारमध्ये संततधारेचा जोर येत्या काही दिवसांत कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या तांडवामुळे गेल्या चार दिवसांत बिहारमध्ये २८ जणांचा बळी गेला आहे. (वृत्तसंस्था)बंगालच्या माल्दा जिल्ह्यातही हाहाकारमुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा तडाखा तेथील अडीच लाख लोकांना बसला आहे. या जिल्ह्यातील सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. गंगा नदीच्या पुराच्या पाण्यात अनेक घरे वाहून गेली आहेत.पूरग्रस्तांसाठी मदतकार्यात एनडीआरएफचे पथक, तसेच स्थानिक पोलीस सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Biharबिहारfloodपूर