शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारे काँग्रेसचे ट्विट वादात, नेटिझन्सच्या संतापानंतर डिलीट केले ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 16:10 IST

श्रीदेवींच्या निधनानंतर सोशल मीडियावर लहान मोठ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाकडूनही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र काँग्रेसचे श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारे ट्विट वादात सापडले.

नवी दिल्ली -  श्रीदेवींची अकाली एक्झिट त्यांच्या असंख्य चाहत्यांना सदमा देऊन गेली. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर लहान मोठ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाकडूनही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र काँग्रेसचे श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारे ट्विट वादात सापडले. नेटिझन्सनी ट्विटमधील मजकुरावरून काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. अखेर काँग्रेसकडून हे ट्विट डिलीट करण्यात आले. त्याचे झाले असे की, श्रीदेवींच्या निधनाची बातमी आल्यानंतर आज सकाळी काँग्रेसकडून ट्विटरवर ट्विट करून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहण्यात आली. "श्रीदेवींच्या निधनाचे वृत्त ऐकून आम्हाला दु:ख झाले आहे. त्या एक उत्कृष्ट कलाकार होत्या. त्या आपल्या सुखेर अभिनयामुळे आमच्या हृदयात कायम वास करतील. त्यांच्या चाहत्यांप्रति आम्ही सहवेदना प्रकट करतो. त्यांना 2013 साली यूपीए सरकारच्या कार्यकाळात पद्मश्री देण्यात आला होता." असे ट्विट काँग्रेसने केले. मात्र या ट्विटमधील शेवटची ओळ वादाचे कारण बनली. अनेट नेटीझन्सनी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य बनवण्यास सुरुवात केली. शेकडो जणांनी ट्विट करून मृत्युप्रसंगी राजकारण न करण्याचा सल्ला दिला. अखेर सोशल मीडियावरील वाढता वाद पाहून काँग्रेसने हे ट्विट डिलीट केले.  त्यानंतर काँग्रेसने चूक सुधारत नवीन ट्विट करून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली. 

- काँग्रेसचे वादात सापडलेले ट्विट

 

टॅग्स :Srideviश्रीदेवीentertainmentकरमणूकcongressकाँग्रेस