शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पर्यावरणाचे एक लाख कोटी अन्यत्र वळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 05:10 IST

पर्यावरण रक्षण आणि लोकांच्या भल्यासाठी विविध प्रकारच्या निधींच्या रूपाने बाजूला काढून ठेवलेली सुमारे एक लाख कोटी रुपयांची रक्कम देशातील सरकारे अन्य कामांसाठी वळवत असल्याचे निदर्शनास आल्यावर, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी संताप व्यक्त केला.

नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण आणि लोकांच्या भल्यासाठी विविध प्रकारच्या निधींच्या रूपाने बाजूला काढून ठेवलेली सुमारे एक लाख कोटी रुपयांची रक्कम देशातील सरकारे अन्य कामांसाठी वळवत असल्याचे निदर्शनास आल्यावर, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी संताप व्यक्त केला. आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला, पण तुम्ही आमची फसवणूक करत आहात, असे भाष्य न्यायालयाने उद्वेगाने काढले.पर्यावरणवादी कार्यकर्ते एम. सी. मेहता यांनी २३ वर्षांपूर्वी केलेल्या एका जनहित याचिकेवरील सुनावणीत न्या. मदन बी. लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने केंद्र आणि विविध राज्य सरकारांची खरडपट्टी काढली. सरकार काही करत नाही आणि आम्ही त्यांच्या मागे तगादा लावला की, न्यायालये अधिकार सोडून वागत असल्याचे दूषण दिले जाते, असे सांगून न्यायाधीश म्हणाले की, पैसा अन्यत्र वळविल्याबद्दल आम्ही त्यांना पकडले की, मगच ते कामाला लागणार की काय? हेच करत बसायला आम्ही पोलीस किंवा तपासी अधिकारी आहोत का? हे सर्वच अगदी हताश करणारे आहे.न्यायाधीश म्हणाले की, न्यायालयाने विविध वेळी दिलेल्या आदेशांनुसार पर्यावरण रक्षणासाठी देशभरात केंद्र व राज्यांच्या पातळीवर विविध निधी स्थापन करण्यात आले असून, त्यांत सुमारे एक लाख कोटी रुपयांची रक्कम जमा आहे, परंतु हे पैसे इच्छित कामांसाठी न वापरता भलत्याच कामांसाठी वापरले जात असल्याचे दिसते.ओडिशा सरकार या निधींमधील पैसा रस्ते बांधणी, बस स्टँडचे नूतनीकरण आणि कॉलेजांमधील विज्ञान प्रयोगशाळांसाठी वापरले जात असल्याचे लक्षात आल्यावर, न्यायालयाने हा विषय अधिक खोलात जाऊन तपासला. रस्ते बांधणे, रस्त्यांवर दिवाबत्ती करणे हे सरकार म्हणून तुमचे कामच आहे. त्यासाठी लोकांचा पैसा तुम्हाला वापरता येणार नाही, असे न्यायाधीश म्हणाले. तुम्ही काहीही आदेश द्या. आम्हाला हवे तेच आम्ही करणार, असा सरकारचा हेका दिसतो. त्यामुळे न्यायालयाने कोणत्या पातळीपर्यंत जाणे अपेक्षित आहे, पण आम्ही हे खपवून घेणार नाही. बाजूला ठेवलेला पैसा तुम्हाला ठरलेल्या कामांसाठीच वापरावा लागेल, असे न्यायालयाने विविध सरकारांच्या वकिलांना सांगितले. हा पैसा कशासाठी वापरता येईल व कशासाठी वापरता येणार नाही, हे आम्हाला सांगावे, असे पर्यावरण मंत्रालयाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ए. एन. एस. नाडकर्णी म्हणाले.>पैसे कशासाठी वापरणार ते सांगान्यायालयाने पर्यावरण खात्याच्या सचिवांना असा आदेश दिला की, आमच्या आदेशांनुसार केंद्रात व राज्यांमध्ये स्थापन केल्या गेलेल्या विविध निधींची व त्यांत जमा असलेल्या रकमांचे एकत्रित संकलन करावे, तसेच हा पैसा कसा व कशासाठी वापरण्याचा इरादा आहे, हेही ३१ मार्चपर्यंत सांगावे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय