शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कीने नाकारले तर इजिप्तने स्वीकारले; जागतिक बाजारपेठेत भारतीय गव्हाच्या मागणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 18:34 IST

Export of Wheat: इजिप्तने भारतीय गव्हाच्या आयातीला मान्यता दिल्यानंतर आता भारताला नवीन परदेशी बाजारपेठ मिळाली आहे. यापूर्वी भारतातील गहू इजिप्तमध्ये निर्यात केला जात नव्हता.

Export of Wheat: गेल्या काही वर्षांत भारतात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. भारतात पिकवले जाणारे अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ परदेशातही निर्यात होतात. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळातही भारतीय गव्हाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. यातच, तुर्कीने भारताचा 55,000 टन गहू खराब असल्याचे कारण देत खरेदी करण्यास नकार दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दुसरीकडे, तुर्कीने गव्हाची खेप नाकारल्यानंतर इजिप्तने हा गहू आयात केला आहे. एवढेच नाही तर इजिप्तने आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारे भारतीय गव्हाची चाचणी घेतल्यानंतर त्याच्या गुणवत्तेचे कौतुकही केले.

भारताला नवीन परदेशी बाजारपेठ मिळालीइजिप्तने भारतीय गव्हाच्या आयातीला मान्यता दिल्यानंतर आता भारताला नवीन परदेशी बाजारपेठ मिळाली आहे. इजिप्त हा आफ्रिकन देश आहे, जिथे भारताने अजून गहू निर्यात केला नव्हता. आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता केल्यानंतर इजिप्त भविष्यातही भारतीय गहू खरेदी करू शकतो. भारतीय गहू खरेदी करण्यापूर्वी अधिकृत इजिप्शियन संघ भारतात आले होते. गहू खरेदीसाठी इजिप्शियन संघाने प्रयोगशाळांमध्ये गव्हाची चाचणी घेतली आणि निकालांवर समाधानी झाल्यानंतर गहू आयात करण्यास मान्यता दिली. यासोबतच गव्हाच्या दर्जेदार उत्पादनासाठी भारताचेही कौतुक करण्यात आले.

भारतीय गहू जगाला आनंद देणारा जगभरातील अनेक देश गव्हाच्या आयात-निर्यातीत सर्वोच्च स्थानावर आहेत. ईयू गहू आंतरराष्ट्रीय बाजारात 43 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर भारतातील गव्हाची किंमत 26 रुपये प्रति किलो आहे. परवडणाऱ्या दरात चांगल्या प्रतीचा गहू निर्यात करून आता बहुतांश देश भारतातून गहू आयात करत आहेत. युरोपियन युनियनच्या गव्हाच्या तुलनेत भारतीय गहू 17 रुपयांनी स्वस्त आणि चांगला आहे. इतर देश सुद्धा 450-480 डॉलर प्रति टन दराने गहू निर्यात करत आहेत.

मध्य प्रदेशातील गव्हाची मागणी वाढली भारतातील बहुतांश राज्यांमध्ये उच्च प्रतीच्या गव्हाची लागवड केली जात असली तरी, इजिप्तला निर्यात होणारा गहू मध्य प्रदेशात घेतला जातो. हा सामान्य गहू नाही, हा गहू मॅकरोनी आणि पास्ता सारख्या विदेशी पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. अन्नधान्याच्या निर्यातीबाबत भारत सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार, 2021 सालापासून भारतीय गव्हाच्या निर्यातीत पाच पट वाढ झाली आहे. एप्रिल 2022 पर्यंत भारताने आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 14.5 लाख टन गहू विकला आहे. कमी किमतीत चांगली गुणवत्ता पाहता आता अनेक देश भारताकडून गहू खरेदी करू लागले आहेत.

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयbusinessव्यवसाय