शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देहत्याग करतो म्हणणारे इरकर कुटुंबीय ताब्यात; धार्मिक पुस्तके, साहित्य जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:10 IST

तुकाराम इरकर व कुटुंबाला बेळगावच्या शासकीय रुग्णालयात बंदोबस्तात नेण्यात आले

अथणी : अनंतपूर (ता. अथणी) येथील तुकाराम इरकर व त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस व आरोग्य प्रशासनाने रविवारी सकाळी ९ वाजता ताब्यात घेतले. आरोग्य तपासणीसाठी त्यांना तालुका आरोग्य केंद्रात नेले. तेथून जिल्हा आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आले आहे. इरकर कुटुंबीयांनी सोमवारी (दि. ८) देहत्यागाचा निर्णय घेतला होता; पण, प्रशासनाने एक दिवस अगोदरच त्यांना ताब्यात घेतले.गेल्या १५ दिवसांपासून इरकर कुटुंब महाराजांच्या भक्तीमध्ये मग्न होते. वैकुंठवासी होण्यासाठी देहत्याग करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने या वस्तीवर दररोज गर्दी होत आहे. त्यांना निर्णयापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न सर्वस्तरावरून झाले. पण, ते ठाम राहिल्याचे दिसताच प्रशासनाने अखेर कारवाईची पावले उचलली.रविवारी सकाळी ७ वाजताच वस्तीला पोलिसांनी घेराव घातला. तालुका प्रशासनाने त्यांच्या आरोग्याची चौकशी करण्याचे निमित्त करून सकाळी ८ वाजता गावापासून दुसरीकडे स्थलांतरित केले. आरोग्य केंद्रात त्यांची तपासणी केली. सध्या पोलिस त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

१६ जणांना यापूर्वीच पाठविले गावी परतदेहत्यागाचा संकल्प केलेल्या अन्य १६ जणांना यापूर्वीच पोलिस खाते व तालुका प्रशासनाने त्यांच्या मूळ गावी परत पाठविले आहे, तर इरकर कुटुंबातील मुलगी माया शिंदे (रा. कुडनूर, ता. जत) यांनाही बोलावून समुपदेशन केले आहे.धार्मिक पुस्तके, साहित्य जप्तरविवारी सकाळी ७ वाजता आलेल्या पोलिसांनी इरकर कुटुंबाची समजूत काढून तुकाराम इरकर, पत्नी सावित्री, मुलगा रमेश, सून वैष्णवी, मुलगी माया यांना रुग्णवाहिकेत बंदोबस्तामध्ये बसविले. त्यांची सर्व धार्मिक पुस्तके, साहित्य जप्त केले. आता घर रिकामे असून, घरास कुलूप ठोकले आहे. तुकाराम इरकर यांचे वडील पांडुरंग इरकर यांनी “माझ्या कुटुंबीयांना बरे करून परत घरी पाठवा,” अशी विनंती पोलिसांना केली आहे.